Join us

chhaava Movie : 'छावा'मधील औरंगजेबसाठी अक्षय खन्नाला नव्हती पहिली पसंती, या अभिनेत्याला झालेली विचारणा, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 10:52 IST

1 / 8
विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांचा 'छावा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. छत्रपती संभाजी महाराजांची गाथा पाहून लोक भावुक होत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचेही भरभरून प्रेम मिळत आहे.
2 / 8
विकी कौशलसोबत रश्मिका आणि अक्षय खन्ना यांचा अभिनयही उत्कृष्ट आहे. अक्षय खन्ना खलनायकाच्या भूमिकेत अप्रतिम दिसतो. या पीरियड ड्रामा चित्रपटात तो औरंगजेबाच्या भूमिकेत दिसत आहे.
3 / 8
लांबसडक केस, वाढलेली दाढी आणि डोळ्यांना सूरमा लावून तो डायलॉग बोलतो तेव्हा सगळेच थक्क होतात. पण तुम्हाला माहित आहे का की औरंगजेबच्या भूमिकेसाठी अक्षय खन्ना निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती. होय, हे खरे आहे.
4 / 8
कोणत्याही लहान-मोठ्या अभिनेत्याला दुसऱ्यांदा एखाद्या चित्रपटात पसंती मिळणे ही नवीन गोष्ट नाही. हा इंडस्ट्रीचा एक भाग आहे आणि हे अनेकदा दिसून येते. अनेकवेळा असे घडते की अभिनेता चित्रपटासाठी सहमत नाही किंवा तारखेचे गणित, सहकलाकार, स्क्रिप्टची ताकद, या सर्व गोष्टी अभिनेत्यासाठी महत्त्वाच्या असतात. अक्षय खन्नाला नशिबाने या चित्रपटात भूमिका मिळाली.
5 / 8
ई-टाइम्सच्या रिपोर्टनुसार, 'छावा'मधील औरंगजेबाच्या भूमिकेसाठी अनिल कपूरला अप्रोच करण्यात आले होते. तो चित्रपट साईन करण्यास तयार होता. जर गोष्टी व्यवस्थित झाल्या असत्या तर अनिल कपूर औरंगजेब झाला असता.
6 / 8
सर्व गोष्टी जुळून न आल्यामुळे अनिल कपूर या चित्रपटात काम करू शकले नाहीत. शेवटी अक्षय खन्नाला ही भूमिका नंतर मिळाली आणि आता तो यात दमदार परफॉर्मन्स देताना दिसत आहे.
7 / 8
'छावा'च्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने चार दिवसांत १४०.५० कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत १०० कोटींचा टप्पा पार केला आहे.
8 / 8
तर 'छावा'ने पहिल्या सोमवारी २४ कोटी रुपये कमावले आणि ३१ कोटी रुपयांच्या मजबूत आकड्याने त्याची सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी ३७ कोटी रुपयांचा व्यवसाय, तिसऱ्या दिवशी छावाने ४८.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
टॅग्स :'छावा' चित्रपटअक्षय खन्नाअनिल कपूररश्मिका मंदानाविकी कौशल