Join us
Daily Top 2Weekly Top 5

एवढा मोठा त्याग! फिट राहण्यासाठी गेली १५ वर्ष अक्षयने खाल्ला नाही 'हा' पदार्थ; बहुतेकजण रोज खातात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 12:35 IST

1 / 7
बॉलिवूडचा सर्वात फिट अभिनेता म्हणून अक्षय कुमारला (Akshay Kumar) ओळखलं जातं. अक्षय गेल्या अनेक दिवसांपासून सक्रीय असून तो आपल्या कडक शिस्तीसाठी आणि आहारासाठी प्रसिद्ध आहे.
2 / 7
अक्षय कुमारने गेल्या १५ वर्षांपासून स्वतःच्या तब्येतीसाठी एका मोठ्या आणि चमचमीत पदार्थाचा त्याग केलाय. तो पदार्थ आपल्यातील बहुतेकजण रोज खातात. तो पदार्थ म्हणजे समोसा.
3 / 7
वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही अक्षय कुमार आपल्या फिटनेसने तरुणांना लाजवेल असा उत्साह टिकवून आहे. त्याने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, तो जंक फूड आणि तेलकट पदार्थांपासून खूप लांब राहतो.
4 / 7
अक्षयच्या मते, जे अन्न शरीराला आवश्यक ते जीवनसत्व देऊ शकत नाही, ते खाण्यात काहीच अर्थ नाही. समोसा हा मैदा आणि तेलापासून बनलेला असतो, जो आरोग्यासाठी घातक मानला जातो, म्हणूनच त्याने अनेक वर्षांपूर्वीच आपल्या आहारातून समोसा वगळला आहे.
5 / 7
अक्षय केवळ आहारावरच नाही, तर जेवणाच्या वेळेवरही खूप लक्ष देतो. तो सूर्यास्तानंतर (संध्याकाळी ७ नंतर) काहीही खात नाही. झोपण्यापूर्वी किमान ३-४ तास आधी जेवल्यामुळे पचनशक्ती सुधारते, असे त्याचे ठाम मत आहे.
6 / 7
तसेच अक्षय साखर आणि जास्त मीठ खाणं देखील टाळतो. अक्षय जिममध्ये तासनतास वजन उचलण्यापेक्षा नैसर्गिकरित्या फिट राहण्याला प्राधान्य देतो. तो योगासने, मार्शल आर्ट्स, पोहणे आणि चालणे यावर जास्त भर देतो.
7 / 7
अक्षयच्या मते, 'जर तुमच्याकडे स्वतःच्या शरीरासाठी दिवसातला एक तास नसेल, तर तुमचे जीवन व्यर्थ आहे.' फिटनेसप्रती असलेल्या याच जिद्दीमुळे अक्षयने आपल्या आरोग्यासाठी या आवडत्या पदार्थाचा त्याग केला आहे.
टॅग्स :अक्षय कुमारफिटनेस टिप्सहेल्थ टिप्सबॉलिवूड