Join us

अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले

By देवेंद्र जाधव | Updated: May 14, 2025 12:12 IST

1 / 7
अभिनेत्री उर्वशी रौतेला ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. उर्वशी सतत काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते.
2 / 7
उर्वशीने आंतरराष्ट्रीय जगतात मानाच्या समजल्या जाणाऱ्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये हजेरी लावली आहे. उर्वशीच्या अनोख्या फॅशनची मनोरंजन विश्वात चांगलीच चर्चा आहे.
3 / 7
उर्वशीने तिच्या ग्लॅमरस लूकने 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये सर्वांचं लक्ष वेधलं. यावेळी उर्वशीच्या आगळ्यावेगळ्या फॅनशची चांगलीच चर्चा आहे
4 / 7
उर्वशीने हातात पोपटाची प्रतिकृती धरली होती. हा पोपट म्हणजे एक पर्स आहे. पोपटाच्या आकाराच्या या पर्सची किंमत तब्बल साडेचार लाख रुपये सांगण्यात येत आहे
5 / 7
याशिवाय उर्वशीच्या खास ड्रेसचीही चर्चा आहे. स्ट्रेपलेस कलरफूल आऊटफिट उर्वशीने परिधान केला आहे.
6 / 7
या आऊटफिटसोबत उर्वशीने रंगीबेरंगी कानातले आणि त्याला साजेसा मॅचिंग हेअरबँडही घातलेला दिसतोय. उर्वशीच्या ड्रेसला या गोष्टी शोभून दिसत आहेत
7 / 7
'कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५'मध्ये सहभागी होणारी उर्वशी ही पहिली बॉलिवूड सेलिब्रिटी ठरली आहे. उर्वशीच्या फॅशनला तोड नाही, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे
टॅग्स :कान्स फिल्म फेस्टिवलउर्वशी रौतेलाहॉलिवूडबॉलिवूड