By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 15:10 IST
1 / 7बॉलिवूडमधील एक अशी अभिनेत्री जिने ११ व्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. परंतु पुढे वेश्याव्यवसाय रॅकेटचे तिच्यावर आरोप झाले आणि तिचं आयुष्य उद्धवस्त झालं. 2 / 7ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे श्वेता बसु प्रसाद. 'मकडी' या सिनेमातून श्वेता बसु घराघरात पोहोचली. या सिनेमातील दुहेरी भूमिकेसाठी श्वेताला वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.3 / 7नंतर 'इक्बाल' सारख्या चित्रपटांमधून आणि 'कहानी घर घर की' सारख्या मालिकांमधून श्वेता बसु घराघरात पोहोचली. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना श्वेताच्या करिअरला मोठा ब्रेक लागला. जेव्हा तिचं नाव थेट वेश्याव्यवसायाच्या रॅकेटमध्ये अडकलं गेलं.4 / 7२०१४ मध्ये हैदराबादमधील एका हॉटेलवर टाकलेल्या छाप्यात तिचे नाव वेश्याव्यवसाय रॅकेटमध्ये अडकले गेले. या बातमीने संपूर्ण मनोरंजन विश्वात खळबळ उडाली होती. पोलिसांनी श्वेताला अटकही केली होती.5 / 7मात्र, नंतर हैदराबाद सत्र न्यायालयाने सर्व आरोपातून तिची निर्दोष मुक्तता केली. श्वेताने नेहमीच ठामपणे सांगितले की, तिला या प्रकरणात फसवण्यात आले होते आणि ती निर्दोष आहे. या काळात तिला मानसिक आणि सामाजिक त्रासाला सामोरे जावे लागले, पण तिने हार मानली नाही.6 / 7या मोठ्या वादग्रस्त प्रकरणातून बाहेर पडल्यानंतर श्वेताने पुन्हा एकदा आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले. तिने वरुण धवन आणि आलिया भट्ट यांच्या 'बद्रीनाथ की दुल्हनिया' सारख्या चित्रपटांतून पुनरागमन केले. मात्र, तिची खरी जादू ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळाली.7 / 7'क्रिमिनल जस्टिस', 'रे', 'होस्टेजेस' आणि 'जामतारा' सारख्या वेब सीरिजमधील श्वेताच्या कामाचे प्रचंड कौतुक झाले. तिच्या अभिनयातील प्रगल्भता पाहून प्रेक्षक पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडले आहेत.