आलिया भट, दीपिका पादुकोण की श्रद्धा कपूर... २०२४ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 18:05 IST
1 / 8२०२४ हे वर्ष लवकरच संपणार आहे. याच दरम्यान बॉलिवूडमधील कोणत्या सौंदर्यवतीने यावर्षी सर्वाधिक मानधन घेतलं आहे हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. 2 / 8आपल्या अभिनयाने आलिया भटने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. २०२४ हे वर्ष अभिनेत्रीसाठी खूपच जास्त खास होतं. आलिया यावर्षी वेदांग रैनासोबत 'जिगरा' चित्रपटात दिसली होती. 3 / 8जिगराया चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नसेल, पण इंग्रजी वेबसाइट मिडच्या न्यूजनुसार, या भूमिकेसाठी अभिनेत्रीने १० ते १५ कोटी रुपये घेतले होते.4 / 8बॉलिवूड आणि साऊथची लोकप्रिय अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या तिच्या अभिनयासोबतच तिच्या डान्स मूव्ह्समुळे चर्चेत आहे.5 / 8अभिनेत्रीने यावर्षीच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'स्त्री २' मध्ये धमाकेदार डान्स केला होता. या तीन मिनिटांच्या गाण्यासाठी अभिनेत्रीने एक कोटी रुपये फी आकारली.6 / 8अभिनेत्री दीपिका पादुकोणचे असंख्य चाहते आहेत. यावर्षी ती फायटर आणि कल्की 2898 एडी सारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये दिसली.7 / 8नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार, अभिनेत्रीने कल्कीसाठी २० कोटी रुपये घेतले होते. यासह दीपिका या वर्षातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे.8 / 8जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, श्रद्धा कपूरने हॉरर कॉमेडी चित्रपट 'स्त्री २' साठी ५ कोटी रुपये इतकी मोठी फी वसूल केली होती.