Join us
Daily Top 2Weekly Top 5

सिनेमात काम न करताही मलायका आहे 100 कोटींची मालकीण; काय आहे अभिनेत्रीचा इन्कम सोर्स, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 15:28 IST

1 / 9
बॉलिवूडची फिटनेस फ्रीक अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही मलायकाचा फिटनेस एखाद्या २० वर्षाच्या तरुणीला लाजवेल असाच आहे.
2 / 9
गेल्या कित्येक वर्षांपासून मलायका बॉलिवूडमध्ये सक्रीय आहे. अनेकदा ती सिनेमातील आयटम साँग्समध्ये झळकली आहे.
3 / 9
सोशल मीडियावर सक्रीय असलेली मलायकाचा बॉलिवूड सिनेमांमधील वावर तसा कमी झाला आहे. मात्र, ती बॉलिवूड पार्ट्यांना कायम हजर असते.
4 / 9
मलायकाच्या फिटनेसोबत तिच्या लक्झरी लाइफस्टाइलचीदेखील नेटकऱ्यांमध्ये कायम चर्चा रंगत असते.
5 / 9
गेल्या काही वर्षांमध्ये मलायकाने एकाही सिनेमात काम केलं नाही. मात्र, तिची लाइफस्टाइल प्रचंड लक्झरी आहे. त्यामुळे मलायकाच्या कमाईचा सोर्स नेमका काय असावा किंवा तिची एकूण संपत्ती किती असेल असा प्रश्न नेटकऱ्यांना पडतो.
6 / 9
मीडिया रिपोर्टनुसार, मलायका सिनेमात जरी झळकत नसली तरी सुद्धा ती मॉडेलिंग आणि रिअॅलिटी शोच्या माध्यमातून पैसे कमावते.
7 / 9
मलायका कोणत्याही शोच्या एका एपिसोडसाठी ५ ते ६ लाख रुपये मानधन घेते. तसंच ती फिटनेस अॅपच्या माध्यमातूनही पैसे कमवते.
8 / 9
योगा, इ-कॉमर्स ब्रँड आणि जाहिराती हे मलायकाच्या कमालीचा मूळ स्त्रोत आहे.
9 / 9
मलायकाकडे जवळपास ९८ कोटींची संपत्ती आहे. तसंच वांद्रे येथे तिचं २० कोटींचं घरदेखील आहे.
टॅग्स :मलायका अरोराबॉलिवूडसिनेमासेलिब्रिटी