Join us
Daily Top 2Weekly Top 5

'दंगल गर्ल'च्या वडिलांचं नाव आहे विपिन शर्मा, हिंदू पिता असूनही फातिमाने मुस्लीम धर्म स्वीकारला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 17:33 IST

1 / 8
कमल हसन यांचा लोकप्रिय सिनेमा 'चाची 420' मध्ये दिसलेली चिमुकली नंतर बॉलिवूडची दंगल गर्ल बनली. ती अभिनेत्री आहे फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh). आज फातिमा ३१ वा वाढदिवस साजरा करत आहे.
2 / 8
फातिमाचा जन्म हैदराबादमध्ये झाला मात्र ती मुंबईत लहानाची मोठी झाली. फातिमा हिंदू कुटुंबात जन्माला आली आहे. होय तिच्या वडिलांचं नाव विपीन शर्म आहे. तर आई राज तब्बसुम काश्मीरी मुस्लिम कुटुंबातून आल्या आहेत.
3 / 8
फातिमाची आई राज तबस्सुम या श्रीनगरच्या आहेत तर वडील विपीन शर्मा हे जम्मूतील ब्राम्हण कुटुंबातील आहेत. वडील हिंदू असले तरी फातिमाच्या घरी मुस्लीम धर्माचं पालन केलं जातं. म्हणूनच तिचं नाव फातिमा सना शेख असं ठेवलं गेलं. तर तिच्या भावाचं नाव शानिब शेख आहे.
4 / 8
तिने टीव्हीमध्येही काम केले आहे. 'बेस्ट ऑफ लक निक्की','लेडीज स्पेशल','अगले जनम मोहे बिटिया ही कीजो' या टीव्ही शोमध्ये तिने काम केले.
5 / 8
मुंबईतच वाढलेल्या फातिमाने 'चाची 420' मध्ये बालकलाकाराची भूमिका साकारली. यानंतर फातिमा 'वन 2 का 4','बडे दिलवाला' या सिनेमांमध्येही बालकलाकाराच्या भूमिकेत दिसली.
6 / 8
फातिमाला खरा ब्रेक मिळाला तो आमिर खानच्या 'दंगल' सिनेमातून. दंगलमध्ये तिने गीता फोगाट या कुस्तीपटूची भूमिका साकारली. तेव्हापासून तिला बॉलिवूडमध्ये 'दंगल गर्ल' ही ओळख मिळाली.
7 / 8
अभिनयाव्यतिरिक्त फातिमाला फोटोग्राफीचीही आवड आहे. सोशल मीडियावर तिने काढलेल्या उत्तम फोटोंचं कलेक्शन आहे. मोजके चित्रपट करुनही फातिमा आलिशान आयुष्य जगते आणि तिच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे.
8 / 8
फातिमाचा नुकताच 'धक धक' आणि 'सॅम बदाहुर' हे चित्रपट रिलीज झाले. तर आता ती लवकरच नसीरुद्दीन शाह यांच्यासोबत 'उल जलूल इश्क' सिनेमात स्क्रीन शेअर करणार आहे. यामध्ये विजय वर्मा देखील आहे.
टॅग्स :फातिमा सना शेखपरिवारबॉलिवूड