By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 11:52 IST
1 / 8Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा हा शेवटचा आठवडा आहे. हा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे. 2 / 8रविवारी पंढरीनाथ कांबळेने बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेतला. पण, पॅडीने बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतल्याने मात्र प्रेक्षक नाराज आहे. 3 / 8पॅडीचा बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवास संपल्यानंतर कलर्स मराठीच्या ऑफिशियल पेजवरुन एक पोस्ट टाकण्यात आली होती. या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 4 / 8अनेकांनी वर्षा उसगावकर घराबाहेर जायल्या हव्या होत्या, असं म्हटलं आहे. तर काहींनी बिग बॉसला unfair म्हटलं आहे. 5 / 8'कुणा कुणाला वाटत वर्षा ताई जायला पाहिजे होत्या', 'कुणा कुणाला वाटत हे चुकीच झालं पॅडी दादा खूप छान खेळतात', अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. 6 / 8'कुणा कुणाला वाटत वर्षा ताई जायला पाहिजे होत्या', 'कुणा कुणाला वाटत हे चुकीच झालं पॅडी दादा खूप छान खेळतात', अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. 7 / 8सुरुवातीला घरात पॅडीचा गेम दिसला नव्हता. पण, भाऊच्या धक्क्यावर रितेशने दिलेल्या सल्ल्यानंतर मात्र पॅडीने त्याचा गेम दाखवण्यास सुरुवात केली. 8 / 8पॅडीने त्याच्या उत्तम खेळीने सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली होती. त्यामुळे त्याला प्रेक्षक टॉप ५मध्ये पाहत होते. आता घरातील सदस्यांपैकी कोण 'बिग बॉस मराठी'च्या ट्रॉफीवर नाव कोरणार, हे पाहावं लागेल.