By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 15:46 IST
1 / 8टीव्हीवरचं सर्वात रोमँटिक कपल म्हणून आशा नेगी (Asha Negi) आणि ऋत्विक धनजानी (Rithvik Dhanjani) यांचं नाव घेतलं जायचं. 7 वर्ष दोघंही रिलेशनशिपमध्ये होते. २०२० साली त्यांचा ब्रेकअप झाला.2 / 8ऋत्विक आणि आशाच्या ब्रेकअपचा सर्वात मोठा धक्का चाहत्यांना बसला. 'आश्विक' नावाने त्यांचे अनेक फॅन पेजेस आहेत. आजही या फॅन पेजेसवर त्यांच्याच पोस्ट असतात.3 / 8आता आशा एका अभिनेत्याला डेट करत असल्याची चर्चा आहे. हा अभिनेता ऋत्विकचाच मित्रही आहे. आशाचे या हँडसम हंकबरोबरचे काही फोटो आता व्हायरल होत आहेत.4 / 8हा अभिनेता आहे आर्यमन सेठ (Aaryaman Seth). अभिनेत्री कीश्वर मर्चंटने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केलेत. यामध्ये आशा आणि आर्यमन एकमेकांचा हात हात घेऊन बसले आहेत.5 / 8शिवाय एका फोटोत आशाने कीश्वरच्या मुलाला कडेवर घेतलं आहे. आणि बाजूला आर्यमन तिच्या खांद्यावर हात ठेवून उभा आहे. 6 / 8सोशल मीडियावर आर्यमन आणि आशाचे अनेक फोटो आहेत. दोघंही एकमेकांचे आधीपासून मित्रही आहेत. तसंच ऋत्विकचाही तो चांगला मित्र आहे.7 / 8गणेशोत्सव सणाच्या वेळी आर्यमनने आशासोबत पारंपरिक लूकमधील काही फोटो पोस्ट केले होते. तेव्हाही त्यांच्या नात्याची चर्चा झाली होती. 8 / 8आर्यमन सेठने अनेक मालिकांमध्ये दिसला आहे. 'महाभारत','बधाई हो बेटी हुई है' ,'बकुळा बुआ का भूत','देवो के देव महादेव' या मालिकांमध्ये तो झळकला आहे. 'तनाव' या वेबसीरिजमध्येही त्याने काम केलं.