Join us

'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारतीय सेनेच्या एअर स्ट्राईकवर आधारीत हे सिनेमे चर्चेत, तुम्ही पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 15:07 IST

1 / 7
भारताने रात्री पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करुन पाक दहशतवाद्यांची ९ तळी उद्धवस्त केली. ऑपरेशन सिंदूर नावाने हे मिशन राबवण्यात आलं. त्यानिमित्ताने मनोरंजन विश्वातील हे सिनेमे चर्चेत आहे
2 / 7
२०१९ ला उरी- द सर्जिकल स्ट्राईक हा सिनेमा चांगलाच गाजला. विकी कौशलने या सिनेमात प्रमुख भूमिका साकारली.
3 / 7
२०२० मध्ये अवरोध-द सीज विदइन ही वेबसीरिज रिलीज झाली होती. दिवंगत अभिनेते विक्रम गोखलेंनी या सीरिजमध्ये काम केलं होतं. बालाकोट एअरस्ट्राईकवर ही वेबसीरिज आधारीत होती.
4 / 7
फायटर सिनेमाही चांगलाच गाजला. या सिनेमात हृतिक रोशन, अनिल कपूर, दीपिका पादुकोण यांच्या प्रमुख भूमिका होत्या. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकवर हा सिनेमा आधारीत होता.
5 / 7
२०२५ ला रिलीज झालेला स्काय फोर्स हा सिनेमाही सत्य घटनेवर आधारीत होता. १९६५ साली भारताने पाकिस्तानवर जी पहिली एअर स्ट्राईक केली त्यावर हा सिनेमा आधारीत होता.
6 / 7
बालाकोट एअरस्ट्राईक आणि भारतीय सेनेच्या अंतर्गत बाबींवर रणनीती या वेबसीरिजने प्रकाश टाकला होता. या वेबसीरिजच्या विषयाचंही चांगलंच कौतुक झालं
7 / 7
जान्हवी कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या गुंजन सक्सेना सिनेमाचीही चांगलीच चर्चा रंगली. कारगील युद्धात भारतीय वायुसेनेतून युद्धात सहभागी होणाऱ्या पहिल्या स्त्री पायलट गुंजन सक्सेन यांच्या आयुष्यावर हा सिनेमा आधारीत होता
टॅग्स :ऑपरेशन सिंदूरसर्जिकल स्ट्राइकपाकिस्तानभारतबॉलिवूड