1 / 7हिना खानने नुकतीच तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. लाँग टाईम बॉयफ्रेंडसोबत हिना खानने लग्न केलंय.2 / 7 सोशल मीडियाच्या माध्यमातून हिनाने तिचा बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालशी लग्न केल्याची गुड न्यूज सर्वांना दिली आहे. हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहे3 / 7हिना खानने लग्नाचा हा निर्णय घेतल्याने तिच्या सर्व चाहत्यांनी अभिनंदन केलं आहे. हिना खानने लग्नाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत4 / 7हिना खान कॅन्सरचं निदान झाल्यावर निराश न होता आयुष्याचे सकारात्मक क्षण सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. त्यामुळे हिनाने लग्नाचे फोटो पोस्ट करताच तिच्या सर्व चाहत्यांना आनंद झाला आहे5 / 7हिना खानने लग्नात पांढरी साडी परिधान केली असून तिचा बॉयफ्रेंड रॉकीने पांढरा कुर्ता परिधान केला आहे. हिनाने लग्नात पारंपरिक पोशाख परिधान करुन सर्वांचं लक्ष वेधलंय6 / 7हिना खानने अत्यंत साधेपणाने आणि जवळच्या मित्र-मैत्रीणींच्या उपस्थितीत कोर्ट मॅरेज केलं आहे. कोणताही दिखावा किंवा गाजावाजा न करता हिनाने लग्न केलंय7 / 7हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत असून ती उपचार घेत असते. दरम्यान बॉयफ्रेंडसोबत लग्न केल्याने हिनाने तिच्या आयुष्याला नव्याने सुरुवात केली, असं म्हणता येईल