Join us  

अभिनेत्रीची रॉयल फॅमिली! आजोबा माजी पंतप्रधान तर आई गायिका; 21 व्या वर्षी लग्न अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 9:28 AM

1 / 9
बॉलिवूडमध्ये अनेक असे कलाकार आहेत जे अतिशय स्ट्रगल करुन वर येतात. फिल्मी बॅकग्राऊंड नसताना ते मेहनतीने यश मिळवतात. तर दुसरीकडे असेही कलाकार आहेत ज्यांना घरातूनच अभिनयाचा वारसा मिळालेला असतो. दरम्यान एक अशी अभिनेत्री आहे जी चक्क रॉयल फॅमिलीतून आली आहे.
2 / 9
आम्ही सांगत आहोत अभिनेत्री आदिती राव हैदरीबद्दल (Aditi Rao Hydari). आदितीने साऊथ आणि हिंदी अशा दोन्ही इंडस्ट्रीत काम केलं आहे. तिच्या सौंदर्याने तिने सर्वांनाच भुरळ घातली आहे. सिनेमा असो किंवा वेबसिरीज तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
3 / 9
'प्रजापति' या मल्याळम सिनेमातून तिने करिअरची सुरुवात केली. 'रॉकस्टार' या बॉलिवूड सिनेमातही तिने काम केले. नंतर 'दास देव','पद्मावत' या सिनेमांत तसंच नुकत्याच आलेल्या 'ताज-डिव्हायडेड बाय ब्लड','ज्युबिली' या सिरीजमध्ये तिने काम केलं आहे.
4 / 9
आदितीच्या फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल ऐकलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. ती शाही कुटुंबातून येते. आदितीचे आजोबा अकबर हैदरी हे 1869 ते 1941 पर्यंत तत्कालीन स्थापित झालेल्या हैदराबाद राज्याचे पंतप्रधान होते. तर तिचे काका आसामचे माजी राज्यपाल आहेत.
5 / 9
आदितीची आई विद्या राव या प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आहेत. त्यांच्या ठुमरी लोकप्रिय आहेत. तर तिच्या आईचे वडील जे रामेश्वर राव हे वानापथीचे राजा होते. तसंच ते निजामाच्या काळात राजदरबारातील कुलीन होते.
6 / 9
अभिनेता आमीर खानची पूर्व पत्नी किरण राव आणि आदिती या चुलत बहिणी आहेत. आदितीच्या आईचे वडील हे किरण रावचेही आजोबा आहेत.
7 / 9
आदितीचं करिअर सध्या रुळावर आहे. मात्र तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक घडामोडी घडून गेल्या आहेत. वयाच्या 17 व्या वर्षी आदिती पहिल्यांदा अभिनेता सत्यदीप मिश्राला भेटली. दोघंही एकमेकांच्या प्रेमात होते. तर 2009 मध्ये वयाच्या 21 व्या वर्षी तिने सत्यदीपशी लग्नगाठ बांधली.
8 / 9
मात्र काही वर्षांनी दोघांमध्ये खटके उडाले. लग्नानंतर ४ वर्षांनी 2013 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. मात्र आदिती कधीच तिच्या या नात्याबद्दल जाहीरपणे बोलली नाही. सत्यदीपने नुकतेच फॅशन डिझायनर मसाबाशी लग्न केले आहे.
9 / 9
सध्या आदिती प्रसिद्ध मल्याळी अभिनेता सिद्धार्थला डेट करत आहे. दोघंही सोशल मीडियावर एकमेकांसोबत फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. आदिती आणि सिद्धार्थ दोघांनी 2021 मध्ये आलेल्या 'महासमुद्रम' या सिनेमात एकत्र काम केले होते.
टॅग्स :आदिती राव हैदरीसिनेमाबॉलिवूडपरिवार