Join us

Janhit Mein Jaari Trailer : कंडोम विकणारी सुपर वुमनिया, ‘जनहित में जारी’चा ट्रेलर पाहून पोट धरून हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 17:56 IST

Janhit Mein Jaari Trailer : विषय बोल्ड असला तरी हा चित्रपट मजेशीर आहे. ट्रेलर पाहून तरी हेच दिसतंय. ‘जनहित में जारी’चा ट्रेलर काही क्षणांपूर्वीच रिलीज झाला आहे.

Janhit Mein Jaari Trailer : कॉमेडी सिनेमाच्या प्रतीक्षेत असाल तर एक सिनेमा लवकरच तुमच्या भेटीस येतोय. होय, नुसरत भरूचा (Nushrratt Bharuccha ) हिचा कंडोमबद्दल जनजागृती करणारा आणि खळखळून हसवणारा ‘जनहित में जारी’ (Janhit Mein Jaari ) हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. विषय बोल्ड असला तरी हा चित्रपट मजेशीर आहे. ट्रेलर पाहून तरी हेच दिसतंय.‘जनहित में जारी’चा ट्रेलर काही क्षणांपूर्वीच रिलीज झाला आहे. ट्रेलर पाहून तुम्ही पोट धरून हसाल. शिवाय नुसरतच्या तोंडचे संवाद ऐकून विचारही कराल. सामाजिक बंधनांना झुगारून एक मुलगी कंडोम विकायला तयार होते, असा या चित्रपटाचा विषय आहे.

नुसरत यात लीड रोलमध्ये आहे आणि तिच्या अपोझिट अनुद सिंह दिसतोय. याशिवाय विजय राज, परितोष त्रिपाठी, टीनू आनंद, बिजेंद्र कला, नेहा सराफ यांच्या या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

या चित्रपटाचं पोस्टर आणि टीझर प्रदर्शित झाला तेव्हापासून नुसरत ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. कंडोमला प्रमोट करणाºया नुसरतला वाईटरित्या ट्रोल केलं जातंय. अलीकडे नुसरतने देखील ट्रोलर्सला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. ट्रोलर्सच्या पोस्टचे स्क्रीनशॉट्स शेअर करत तिनं याबद्दलची पोस्ट केली होती. ‘बास्स, हेच विचार बदलायचे आहे. हेच तर मी सांगते आहे. तुम्ही बोला, मी तुम्हाला उत्तर देते,’ असं ती म्हणाली होती.  ‘जनहित में जारी’ हा चित्रपट येत्या 10 जूनला चित्रपटगृहांत प्रदर्शित होतोय.

टॅग्स :नुसरत भारूचाबॉलिवूडसिनेमा