Join us

'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' सिनेमाचा नवीन टीझर भेटीला, 'आई कुठे..' फेम अश्विनी महांगडेची खास भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 11:23 IST

'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' सिनेमाचा नवीन टीझर रिलीज झाला असून सर्वांना या टीझर आवडला आहे

सध्या मराठी मनोरंजन विश्वात एका सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. तो सिनेमा म्हणजे 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई'. संत ज्ञानेश्वर,निवृत्तीनाथ,सोपान आणि मुक्ताबाई या भावंडांची दिव्यगाथा 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' सिनेमातून बघायला मिळणार आहे. या सिनेमाचाी पहिली झलक अर्थात टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये आदिशक्तीचं आणि स्त्रियांच्या असामान्य प्रतिभेचं दर्शन घडतं. जाणून घ्या 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' टीझरविषयी

'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई'चा टीझर

'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' सिनेमाचे निर्माते-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई'चा नवीन टीझर रिलीज केलाय. या टीझरमध्ये मुक्ताईच्या जन्मापासून  त्यांचा संत मुक्ताबाई होण्याचा प्रवास पाहायला मिळतोय. 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' सिनेमात 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री अश्विनी महांगडेची विशेष भूमिका साकारणार आहे.  टीझरमध्ये संत मुक्ताबाईंच्या असामान्य व्यक्तिमत्वाचं दर्शन घडतं. 

कधी रिलीज होणार 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई'

या सिनेमात ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत अभिनेता तेजस बर्वे दिसणार असून संत मुक्ताईची भूमिका नेहा नाईक हिने साकारली आहे. संत निवृत्तीनाथांच्या भूमिकेत अक्षय केळकर तर संत सोपानकाकांची भूमिका सूरज पारसनीस यांनी केली आहे. यासोबत  समीर धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, मनोज जोशी, योगेश सोमण, स्मिता शेवाळे, सचिन देशपांडे, अभिजीत शवेतचंद्र, नुपूर दैठणकर, आदिनाथ कोठारे यांच्यासुद्धा  चित्रपटात भूमिका आहेत. हा सिनेमा १८ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.

टॅग्स :संत ज्ञानेश्वरसंत ज्ञानेश्वर पालखीआळंदीमराठी अभिनेतामराठी चित्रपट