Join us

अखेर घटस्फोटावर नेहा कक्करने सोडलं मौन, दिली पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 09:43 IST

नेहा कक्कर हिच्या खासगी आयुष्यात वादळ आल्याचे काही दिवसांपासून बोललं जातं होतं.

बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्कर हिला वेगळ्या ओळखीची गरज नाही. बॉलिवूडमधील टॉपच्या गायिकांमध्ये नेहाचं नाव आहे. नेहाने तरुणाईला तर आपल्या गाण्याने वेड लावलं आहे. नेहा सध्या तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नेहा आणि रोहनप्रीत सिंग घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. यातच आता नेहा कक्कर हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना नेहा कक्कर दिसलीये. 

ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत नेहा म्हणाली, 'मी लग्न केल्यापासून फक्त दोनच अफवा आहेत. पहिली अफवा की मी गरोदर आहे आणि दुसरी अफवा ती म्हणजे माझा घटस्फोट होत आहे. अशा बातम्या ऐकून खूप वाईट वाटतं. लोक गॉसिपसाठी काहीही म्हणतात, पण मी या सर्व गोष्टींकडे लक्ष न देण्याचा प्रयत्न करते. कारण मला सत्य काय आहे हे माहित आहे'.

नेहाने टीव्हीवरून ब्रेक घेण्याचं कारण सांगितलं. ती म्हणाली, 'हा ब्रेक माझ्यासाठी आवश्यक होता. मी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप थकले होते. एक वेळ अशी आली की माझ्या नियंत्रणात काहीच नव्हतं. मी लहान वयातच या उद्योगात काम करायला सुरुवात केली. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी हे करणे आवश्यक होतं. पण आता मी पूर्ण उर्जेने परतले आहे'.

नेहा आणि रोहनप्रीतचे २०२१ मध्ये लग्न झालं होतं. दोघांचं लव्ह मॅरेज झालेले आहे. लग्नानंतर नेहानं कुटुंबावर लक्ष क्रेंदित केलं होतं. नेहा कक्कर आणि रोहनप्रीत यांच्या लग्नाला आता 3 वर्ष झाली आहेत. नेहा कक्कर ही गेल्या काही दिवसांपासून मोठ्या पडद्यापासूनही दूर आहे. ती 2022 मध्ये इंडियन आयडल शोमध्ये जज म्हणून दिसली होती.  

टॅग्स :नेहा कक्करसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा