Join us

गावच्या मातीत हरवून गेली पल्लवी पाटील; व्हिडीओतून घडवलं गावच्या संस्कृतीचं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 14:18 IST

Pallavi patil: गावरान पद्धतीचं जेवण, संथ वाहणारी नदी..; पल्लवी पाटीलने शेअर केला मनमोहून टाकणारा गावचा व्हिडीओ

'नवा गडी नवं राज्य' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे पल्लवी पाटील. या मालिकेत आनंदी ही भूमिका साकारुन तिने तुफान लोकप्रियता मिळवली. त्यामुळे आज सोशल मीडियावर तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात धावपळ करणाऱ्या पल्लवीने या सगळ्या गोंधळातून थोडासा ब्रेक घेतला आहे.

पल्लवीने तिच्या बिझी शेड्युलमधून थोडीशी विश्रांती घेतली असून तिने थेट तिचं गाव गाठलं आहे. पल्लवी तिच्या गावी गेली असून इथला एक सुरेख व्हिडीओ तिने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने तिच्या गावची झलक चाहत्यांना दाखवली आहे.

 पल्लवीने गावी गेल्यानंतर तिचं गावपण जपलं आहे.  गावातलं छानसं देऊळ, टुमदार माड्या, बैलगाडी, गावचं शेत, देवाची पालखी, गावरान पद्धतीचं जेवण हे सारं काही तिने तिच्या व्हिडीओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. 'मन गहिवरून जावं असं माझं छोटस गाव !!,' असं कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

दरम्यान, पल्लवीच्या गावची झलक पाहिल्यानंतर अनेकांनी तिच्या गावाचं नाव विचारलं आहे. यात काही चाहत्यांनी तिचं गाव चाळीसगाव असल्याचं म्हटलं आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारपल्लवी पाटीलसिनेमा