नाना पाटेकर हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत काम करणारे अभिनेते म्हणजे नाना पाटेकर. नानांनी 'काला' सिनेमातून रजनीकांतसोबत काम करुन साउथ इंडस्ट्रीमध्येही काम केलंय. नाना अलीकडेच 'ओ रोमियो' या सिनेमात झळकले. या सिनेमात नानांनी साकारलेल्या भूमिकेचं कौतुक झालं. अशातच नाना आता आगामी हिंदी वेबसीरिजमध्ये काम करणार आहेत. या वेबसीरिजचा पहिला प्रोमो रिलीज झाला आहे.
नानांच्या वेबसीरिजचा प्रोमो, कुठे बघाल?
नाना पाटेकरांची आगामी वेबसीरिज 'संकल्प'चा प्रोमो रिलीज झालाय. या प्रोमोत नाना एका पंडिताच्या भूमिकेत दिसत आहेत. या पंडिताला त्या भागात मोठा आदर-सन्मान असलेला दिसतोय. प्रत्येक मोठा व्यक्ती येऊन पंडिताशी सल्लामसलत करताना दिसतो. अशातच प्रोमोच्या शेवटी नानांचं हिंसक रुप पाहायला मिळतं. अवघ्या काही सेकंदांचा हा प्रोमो जबरदस्त असून नानांचा संयमी तरीही आक्रमक अवतार बघायला मिळतोय.
Web Summary : Nana Patekar stars in the upcoming web series 'Sankalp' as a respected Pandit. The series, directed by Prakash Jha, features a stellar cast and will be released on MX Player. Release date is awaited.
Web Summary : नाना पाटेकर आगामी वेब सीरीज 'संकल्प' में एक सम्मानित पंडित की भूमिका में हैं। प्रकाश झा द्वारा निर्देशित इस सीरीज में शानदार कलाकार हैं और यह एमएक्स प्लेयर पर रिलीज होगी। रिलीज की तारीख का इंतजार है।