Join us
Daily Top 2Weekly Top 5

'त्याची अन् माझी तुलनाच होऊ शकत नाही'; नाना पाटेकरांसोबत काम करण्याविषयी बिग बींच थेट वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 15:27 IST

Amitabh bachchan: बॉलिवूड अभिनेता राजकुमार यांनीही नाना पाटेकरांसोबत काम करण्यास नकार दिला होता.

बॉलिवूडमधील दोन दिग्गज कलाकार म्हणजे नाना पाटेकर (Nana Patekar) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan). प्रचंड अनुभव आणि दमदार अभिनयशैली यामुळे हे दोन्ही कलाकार एकमेकांना तोडीस तोड आहेत. दोघांच्याही अभिनयाचं एक वेगळं कौशल्य आहे. त्यामुळे या दोघांची तुलना होणं कदापि शक्य नाही. परंतु,  एका मुलाखतीमध्ये बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी नाना पाटेकरांसोबत माझी तुलना होऊच शकत नाही, असं म्हटलं होतं.

गेल्या कित्येक वर्षांपासून नाना पाटेकर आणि अमिताभ बच्चन यांनी एकत्र स्क्रीन शेअर केलेली नाही. परंतु, १९९९ मध्ये या जोडीने मेहुल कुमार यांच्या कोहराम या सिनेमात एकत्र काम केलं होतं. या सिनेमातील दोघांचाही अभिनय तुफान गाजला होता. त्यामुळे नाना सरस की अमिताभ बच्चन अशी प्रेक्षकांमध्ये बराच काळ चर्चा रंगली होती. इतकंच काय तर या सिनेमानंतर हिट झालेली ही जोडी पुन्हा एकत्र दिसेल अशी अनेकांना आशा होती. मात्र, प्रत्यक्षात तसं काही झालं नाही.

'तो खूप अशिक्षित आहे'; राजकुमारने दिला होता नाना पाटेकरांसोबत काम करण्यास नकार

सूत्रांच्या माहितीनुसार, कोहराम या सिनेमाच्या वेळेस नाना आणि अमिताभ यांच्यात वाद झाले होते.त्यामुळे त्यांनी एकत्र काम न करायचा निर्णय घेतला. कोहराममध्ये एक फायटिंग सीन होता. हा सीन शूट करत असताना दोघांमध्ये वाद झाला. या वादाविषयी त्याकाळी बरंच काही छापून आलं होतं. काही वर्षांपूर्वी नाना पाटेकर यांनी इंडियन एक्स्प्रेसला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी अमिताभ बच्चनसोबत काम करण्याविषयी भाष्य केलं होतं. 

"आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. पण, पुन्हा कधी एकत्र काम करु हे माहित नाही. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. आता परत त्याच त्याच गोष्टींवर भाष्य करण्यात अर्थ नाही. येत्या काळात जर चांगली स्क्रिप्ट मिळाली तर आम्ही एकत्र काम करु", असं नाना म्हणाले होते.

'खात्यात १५ हजार आहेत,तुला हवे तेवढे काढ'; पडत्या काळात अशोक सराफ यांनी केली होती नाना पाटेकरांना मदत

नानांच्या या वक्तव्यानंतर २०१६ मध्ये त्यांचा नटसम्राट हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा सिनेमा गाजल्यानंतर त्याचा हिंदी रिमेकही होणार असल्याचं म्हटलं जात होतं. या रिमेकमध्ये अमिताभ बच्चन मुख्य भूमिका साकारणार होते. परंतु, नाना पाटेकरांनी साकारून झालेली भूमिका पुन्हा आपल्याला करायला मिळत असल्याचं समजताच बिग बींनी नकार दिला. याविषयी एका मुलाखतीमध्ये त्यांनी भाष्य केलं होतं.

दरम्यान,  नाना आणि माझी तुलना होऊच शकत नाही. ते खूप प्रभावी कलाकार आहेत. नटसम्राटमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने काम केलंय त्यावरुन त्यांच्या अभिनयाचा अंदाज लावता येतो. मला ही भूमिका करता येणार नाही. त्यांच्यापेक्षा चांगली ही भूमिका मी करु शकत नाही, असं अमिताभ म्हणाले होते.

टॅग्स :नाना पाटेकरअमिताभ बच्चनसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा