Join us
Daily Top 2Weekly Top 5

चंकी पांडेला टपली कोणी मारली? नाना की अक्षय?; 'हाउसफुल्ल ५' ट्रेलर लाँचमधील व्हिडीओ पाहून तुम्हीही हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 13:26 IST

हाउसफुल्ल ५ ट्रेलर लाँचला नाना आणि अक्षय यांचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू येईल

काल 'हाउसफुल्ल ५'चा ट्रेलर लाँच झाला. या ट्रेलर लाँच सोहळ्याला सिनेमाची सर्व स्टारकास्ट उपस्थित होती. नाना पाटेकर, अक्षय कुमार, चंकी पांडे, जॅकी श्रॉफ, चित्रांगदा सिंग, जॅकलीन फर्नांडीस, डिनो मोरिया, अभिषेक बच्चन असे सिनेमातील सर्व कलाकार या ट्रेलर लाँच सोहळ्याला हजर होते. यावेळी अक्षय आणि नानांनी मिळून चंकी पांडेसोबत चांगलाच प्रँक केला. चंकीची रिअॅक्शन त्यावेळी बघण्यासारखी झाली होती.

नाना-अक्षयने मिळून चंकीसोबत केला प्रँक

नाना पाटेकर यांचा एक व्हिडीओ विरल भयानी पेजवर शेअर केला आहे. या व्हिडीओत दिसतं की, "नाना शांतपणे मागे बसलेले असतात. त्यांच्यासमोर चंकी पांडे खाली बसलेला दिसतो. इतक्यात नाना त्याच्या डोक्यावर टपली मारतात आणि शांत बसतात. अचानक कोणीतरी टपली मारल्याने चंकी दचकतो आणि मागे बघतो. पण नाना मी काहीच नाही केलं, अशा नजरेने चंकीकडे बघत असतात. इतक्यात अक्षय कुमारच्या मांडीला हात लावून नाना त्याला चंकीसोबत मस्ती करायला खुणावतात. अक्षय हसतो आणि चंकीच्या डोक्याला हात लावून त्याला कुरवाळतो." 

अशाप्रकारे नाना, चंकी आणि अक्षय कुमारचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही खळखळून हसाल यात शंका नाही. दरम्यान काल 'हाउसफुल्ल ५'चा ट्रेलर लाँच झाला. बिग बजेट कॉमेडी फ्रँचायजी असलेला 'हाउसफुल्ल' सिनेमाचा हा पाचवा भाग आहे. यानिमित्ताने एखाद्या सिनेमाचे पाच भाग येण्याची ही पहिलीच वेळ असेल. साजिद नाडियादवाला यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. या मल्टिस्टारर सिनेमात नाना पाटेकरांना बघण्याची सर्वांना उत्सुकता आहे.

टॅग्स :अक्षय कुमारचंकी पांडेनाना पाटेकरबॉलिवूड