Join us

सुजलेले डोळे, रडवेला चेहरा; मृणालला झालंय तरी काय? फोटो पोस्ट करत म्हणाली, 'कालचा दिवस...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 17:52 IST

मृणालने थकलेल्या अवस्थेत एक फोटो पोस्ट केला आहे.

'सीतारामम' या तेलुगू सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री मृणाल ठाकुरचा (Mrunal Thakur)  प्रवास फारच प्रेरणादायी आहे. टीव्ही मालिका ते फिल्म इंडस्ट्रीपर्यंत तिने स्वत:च्या टॅलेंटने नाव कमावलं आहे. सध्या ती श्रीलंका येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. दरम्यान मृणालने थकलेल्या अवस्थेत एक फोटो पोस्ट केला आहे. ती फारच भावूक झाल्याचं दिसत आहे. 

मृणाल सध्या श्रीलंकेत असून गेले काही दिवस ती तेथील निसर्गरम्य वातावरणाचे फोटो पोस्ट करत होती. मात्र आज तिने इन्स्टाग्रावर स्टोरीवर तिचा सेल्फी पोस्ट केला आहे. यामध्ये तिने तिची व्यथा मांडली आहे. तिचे डोळे पाणावले आहेत. रडून रडून सुजल्यासारखे वाटत आहेत. तिने लिहिले, 'कालचा दिवस खूप कठीण होता पण आज मी जास्त बळकट आणि आनंदी आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी काही पानं असतात जी ते मोठ्याने वाचून दाखवत नाहीत. पण मी ते वाचायचं ठरवलं आहे. कारण एखादा मी जे शिकले ते शिकू शकतो. रोज एक एक दिवस नव्याने जगत आहे.  कधीतरी भोळं आणि असुरक्षित वाटण्यात काहीच गैर नाही.'

मृणाल लवकरच आदित्य रॉय कपूरसोबत 'गुमराह' सिनेमात दिसणार आहे. सध्या ती बॉलिवूडमध्ये जम बसवण्याचा प्रयत्न करत आहे. सीतारामम सिनेमामुळे तिच्या चाहत्यावर्गातही मोठी वाढ झाली आहे.

टॅग्स :मृणाल ठाकूरबॉलिवूडसोशल मीडिया