Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: कार्तिक अन् सौंदर्याला सोडणार दीपिका; कायमस्वरुपी राहणार दीपासोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 14:45 IST

Rang maza vegla: यापुढे या मालिकेत दोन्ही मुली दीपासोबत राहायला जाणार असल्याचं दिसून येतं.

टीआरपीच्या शर्यतीत कायम प्रथम स्थानावर असलेली मालिका म्हणजे रंग माझा वेगळा. या मालिकेतील दीपाने पहिल्या भागापासून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. विशेष म्हणजे या मालिकेत दीपा आणि कार्तिक यांच्या नात्यात आलेल्या चढउतारांमुळे ही मालिका दिवसेंदिवस रंजक होत चालली आहे.यामध्येच आता दीपिकाने इनामदारांच्या घरी जाण्यास नकार दिला आहे.

काही दिवसांपूर्वीच दीपा इनामदारांच्या घरी पुन्हा राहायला गेली होती. श्वेता प्रेग्नंट असल्यामुळे तिची काळजी घेणारं घरात कोणी तरी असावं यासाठी दीपा तिच्या मदतीसाठी गेली आहे. मात्र, इनामदारांच्या घरी गेल्यानंतर तिच्यावर दीपिकाला पळवून नेल्याचा आरोप केला जातो. इतकंच नाही तर तिला तुरुंगातही टाकलं जातं.मात्र, दीपिकाच्या अचानकपणे गायब होण्यामागचं सत्य समोर येतं.

दरम्यान, दीपिका सापडल्यानंतर ती दीपाकडे घरी जाण्याचा हट्ट करते. इतकंच नाही तर मी पुन्हा इनामदारांच्या घरी जाणार नाही असंही सांगते. त्यामुळे आता या मालिकेत दोन्ही मुली दीपासोबत राहायला जाणार असल्याचं दिसून येतं. मात्र, दीपिकादेखील दीपाकडे गेल्यामुळे कार्तिक पुढे काय करणार? काय असेल त्याचा निर्णय हे पाहणं औत्सुक्याचं आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकाररेश्मा शिंदे