Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री रेश्मा शिंदे लवकरच अडकणार लग्नबंधनात; मेहंदी सोहळ्याचे फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 08:45 IST

अभिनेत्री रेश्मा शिंदेंच्या घरी आता लग्नापूर्वीच्या विधींना सुरूवात झाली आहे.

Reshma Shinde: रेश्मा शिंदे (Reshma Shinde) हा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. 'लगोरी', 'नांदा सौख्यभरे', 'चाहूल', 'बंध रेशमाचे' अशा अनेक टीव्ही मालिकांमधून तिने कलाविश्वात स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. स्टार प्रवाहवरील 'रंग माझा वेगळा' या मालिकेतून ती महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. सध्या अभिनेत्री रेश्मा शिंदे 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत जानकी नावाचं पात्र साकारत आहे. या मालिकेतील तिच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होताना दिसतंय. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रेश्मा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. लवकरच ती लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतेच रेश्माने शेअर केलेल्या सोशल मीडियावरील फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अलिकडेच अभिनेत्रीने तिचे केळवणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. रेश्माचं केळवण पाहून तिच्या चाहत्यांना सुखद धक्काच बसला. त्यानंतर आता रेश्मा शिंदेने सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने तिच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर केल्याचे पाहायला मिळत आहेत. 

रेश्मा शिंदेंच्या घरी आता लग्नापूर्वीच्या विधींना सुरूवात झाली आहे. अगदी येत्या काही दिवसात ती लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं कळतंय. रेश्माने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून मेहंदी सोहळ्याचे खास फोटो पोस्ट केलेत. 'माझी मेहंदी' असं कॅप्शनही तिने या फोटोंना दिलंय. विशेष म्हणजे रेश्मा शिंदेने आपल्या मेहंदी सोहळ्यासाठी पारंपरिक लूकमध्ये पाहायला मिळते आहे. तिच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांसह कलाकारांनीदेखील कमेंट केल्या आहेत. 

दरम्यान, आता रेश्मा शिंदेच्या जोडीदाराबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अद्यापही अभिनेत्रीने तिचा होणारा नवरा कोण आहे? याबद्दल सांगितलं नाही. त्यामुळे चाहत्यांचा हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे. 

टॅग्स :रेश्मा शिंदेटेलिव्हिजनसेलिब्रेटी वेडिंगसोशल मीडिया