Join us
Daily Top 2Weekly Top 5

'इंग्रजी गाणी का गातेस?' चाहत्यांच्या प्रश्नावर केतकी माटेगावर म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 14:11 IST

आता पुन्हा एकदा केतकी चर्चेत आली आहे. 

अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर हिने आपल्या अभिनय आणि सुरेल स्वरांनी रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. केतकीने आतापर्यंत अनेक सिनेमात काम केले आहे. केतकी ही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या कायम संपर्कात असते.  नवीन प्रोजेक्टची माहिती केतकी चाहत्यांना पोस्टद्वारे देत असते. आता पुन्हा एकदा केतकी चर्चेत आली आहे. 

केतकीने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. तिने 'Ask me a Question' हे सेशन ठेवलं होतं. यावेळी एका चाहत्यांना तिला तिच्या गाण्याबद्दल विचारलं. 'तू सुरुवातीपासून मराठी गाण्यांना जास्त महत्त्व दिलं आहेस. मग आता इंग्रजी गाणी का गातेस?' असा प्रश्न विचारला आहे. यावर केतकी म्हणाली, 'मावशी लाडकी असली तरी आई ही आईच असते. इंग्रजी गाणी का गाते? याचं कारण लककरच कळेल. पण मराठी गाणी म्हणणं कधीच सोडणार नाही'. केतकीच्या या उत्तराने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

केतकीला फिल्म फेअरचा सर्वोत्कृष्ट गायिका हा पुरस्कार मिळालेला आहे. केतकीने प्रतिभावान संगीतकार इलाई राजा यांच्याकडे त्यांनी हिंदी, तामिळ चित्रपटासाठी ही पार्श्वगायन केले आहे. केतकीने अनेक अध्यात्मिक गाणी देखील गेली आहेत. केतकीला प्रसिद्धी मिळाली ती म्हणजे तिच्या टाईमपास या चित्रपटातून या चित्रपटात तिने साकारलेली प्राजूची भूमिका चांगलीच गाजली.

२०१४ साली रिलीज झालेल्या टाईमपास सिनेमातील दगडू आणि प्राजूने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. केतकी माटेगावकर हिने 'तानी', 'शाळा', 'काकस्पर्श', 'टाइमपास', 'फुंतरू' यांसारख्या चित्रपटात काम केले असून यातील तिच्या अभिनयाचं कौतुक देखील झाले आहे. 

टॅग्स :केतकी माटेगावकरसेलिब्रिटीसामाजिकसोशल मीडिया