Join us

"मी शिवाजीराजे.. सिनेमानंतर कोणी मला विचारलं नाही"; विद्याधर जोशींनी व्यक्त केली खंत

By देवेंद्र जाधव | Updated: July 21, 2025 16:05 IST

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय सिनेमात विद्याधर जोशींनी गोसालिया बिल्डरची भूमिका साकारली होती. परंतु ही भूमिका साकारल्यानंतरही मनातील खंत विद्याधर यांनी व्यक्त केलीय

२००९ साली आलेला 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' हा सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमाची कथा, गाणी, संगीत आणि कलाकारांचा अभिनय अशा गोष्टींची आजही चर्चा होते. सिनेमा सचिन खेडेकर, महेश मांजरेकर यांनी भूमिका साकारली होती. याच सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत विद्याधर जोशी झळकले. गोसालिया या बिल्डरची भूमिका विद्याधर यांनी साकारली होती. ही भूमिका कशी मिळाली आणि एवढी गाजलेली भूमिका मिळाल्यानंतर पुढे काय घडलं? याविषयीची मनातील खंत विद्याधर यांनी बोलून दाखवली.

गोसालिया बिल्डरची भूमिका गाजली, पण..

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत विद्याधर जोशी म्हणाले, "या भूमिकेचं ऑडिशन वगैरे काही नव्हतं. मला नंतर असं कळलं की, या पिक्चरचं आधी एक शूट झालं होतं. पण ते काही कारणाने ते पुढे झालं नाही. त्यामुळे सगळा पिक्चर त्यांनी स्क्रॅप केला. मला जे माहितीये त्याप्रमाणे सचिन खेडेकर सोडून बाकी सगळी कास्ट बदलली. त्यावेळेला मला सांगितलं असं की, महेशने बोला वो गोसालिया के रोल के लिए बाप्पा को बुलाओ. महेशच्या आजूबाजूला जे असिस्टंट होते त्यांना बाप्पा कोण हे माहित नव्हतं. मग महेश म्हणाले, तुम बाप्पा को बुलाओ, हम काम कराएंगे उससे. आणि मग त्याने मला बोलावलं. ऑडिशन वगैरे काही झालं नाही."

"एक दिवशी त्याने फोन केला की, तू क्या कर रहा है फलाना तारीख को. एक काम कर, तू अंधेरी में आ जा. एक बंगला में. वहापर हम एक पिक्चर कर रहे है. वहा पे तू आ जा और शूट करले. मी म्हटलं ठीकेय येतो. मी गेलो आणि केलं शूट. इतकं सहज झालं. मी गेल्यावर मी त्यांना माझ्या भूमिकेबद्दल विचारलं. पांढरेशुभ्र कपडे, सोन्याचे दागिने. बाकीच्यांनी कोणी मला रोलबद्दल सांगितलं नाही. असं ते झालं." 

"शिवाजीराजे भोसले बोलतोय सिनेमानंतर मी फक्त निगेटिव्ह रोलच करतो, असा माझ्यावर शिक्का बसला. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय एवढा गाजलाय पिक्चर, त्यामुळे आपल्यामागे रांग लागेल असं वाटलं होतं. पण पुढचा काही काळ कोणी मला विचारलं नाही. त्यानंतर हापूस नावाचा पिक्चर आला त्यातही विलन साकारला पुढे अर्जुन नावाचा पिक्चर आला त्यातही खलनायक साकारला. पण त्यातही मी सायकल, कॉफी आणि बरंच काही अशा सिनेमांमध्ये छोटासा रोल केला. छोटे रोल आले मोठ्या भूमिका नाही मिळाल्या. माझा होशील ना मालिकेत दादामामा केला. मजा आली करायला."

टॅग्स :विद्याधर जोशीमहेश मांजरेकर टेलिव्हिजनटिव्ही कलाकारमराठी चित्रपट