Join us

"पैसा महत्त्वाचा, पण त्याहूनही महत्त्वाची 'ही' गोष्ट आहे", तेजस्विनी पंडितचं स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 14:25 IST

तेजस्विनी पंडितने सांगितलं आयुष्याचं खरं सूत्र

Tejaswini Pandit Money Importance: तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आज तिचा  'येरे येरे पैसा ३' सिनेमा प्रदर्शित झाला आहे. तिने आतापर्यंत विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. तेजस्विनीच्या सौंदर्यावर, तिच्या एकूणच व्यक्तिमत्वावर चाहते फिदा असतात.  तेजस्विनी नेहमी तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. ती स्पष्ट आणि थेट बोलते.नुकतंच एका मुलाखतीमध्ये तेजस्विनीनं आयुष्यात कोणत्या गोष्टींचं जास्त महत्व आहे, याबद्दल तिचं स्पष्ट मत मांडलं आहे. 

तेजस्विनी पंडितनं अलिकडेच 'अजब गजब'ला मुलाखत दिली. यावेळी तिला प्रश्न विचारण्यात आला की "आयुष्यात पैशाला किती महत्त्व आहे?". यावर उत्तर देताना  तेजस्विनी पंडितने आयुष्याचं खरं सूत्र सांगितलं. ती म्हणाली, "पैसा खुप महत्त्वाचा आहे. पुर्वी असं म्हणायचे की ना की माझ्याकडे प्रेम आहे, मला पैशांची काय गरज. पण, तसं आताच्या जगात नाही होऊ शकत. प्रेम हे हवंच. पण, पैसाही हवाच, स्टेबिलीटी हवी".

 तेजस्विनी पंडितसाठी पैसा यापेक्षाही एक गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. ती म्हणजे आरोग्य. तेजस्विनी म्हणाली, "पैसा याच्याहीवर काही असेल तर ती एकच गोष्ट आहे, ते म्हणजे तुमचं आरोग्य. ते पैशांच्याही वरती आहे. कारण, तुमचं आरोग्य हे तुम्ही नीट ठेवलं, तर तुम्ही काम करु शकाल, पैसे कमाऊ शकाल, पुढे जाऊन तुमचं आरोग्य बिघडलं तर तुम्हाला ते पैसे कामाला येतील. म्हणूनचं 'हेल्थ इज वेल्थ' असं म्हणतात. "सर सलामत तो पगड़ी पचास" ही जी म्हण आहे, ते अगदी खरी आहे. तुमचं आरोग्य खुप महत्त्वाचं आहे आणि त्याकडे तुम्ही लक्ष देण गरजेचं आहे", या स्पष्ट शब्दात तिनं आपलं मत मांडलं.  

तेजस्विनी पंडितचा 'येरे येरे पैसा ३' चित्रपट आज १८ जुलैला प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात तेजस्विनीसह  सिद्धार्थ जाधव, संजय नार्वेकर, उमेश कामत, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर यांच्यासह आणखी काही चर्चित चेहरे आहेत. पहिल्या दोन पार्टच्या यशानंतर आता 'येरे येरे पैसा ३'ची सर्वांना  उत्सुकता होती.

टॅग्स :तेजस्विनी पंडितआरोग्यपैसामराठी अभिनेतामराठी चित्रपट