Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुकन्या मोनेंचा 'सेलिब्रिटी क्रश' कोण माहितीये का? पहिल्याच चित्रपटात सोबत केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 14:47 IST

सुकन्या मोने यांनी आपल्या क्रश सोबतच केलाय पहिला सिनेमा

सध्या मराठी सिनेमा 'बाईपण भारी देवा'ची जोरदार चर्चा आहे. थिएटर हाऊसफुल झाले आहेत. मोठ्या मोठ्या ग्रुपने बायका हा सिनेमा बघायला जात आहेत. बायकांचं विश्व उलगडणारा हा सिनेमा खूपच लोकप्रिय होतोय. महत्वाचं म्हणजे सिनेमातील उत्तम स्टारकास्ट. रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या सहा दिग्गज अभिनेत्रींना दिग्दर्शक केंदार शिंदेने एकत्र आणलं आणि हा चित्रपट घडला. सध्या या सहाही जणी प्रमोशननिमित्ताने दिलखुलास मुलाखती देत आहेत.

'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, दीपा परब आणि सुचित्रा बांदेकर सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी त्यांच्या पहिल्या क्रशविषयीही सांगितलं. यावेळी सुकन्या मोने म्हणाल्या, "माझा पहिला क्रश अनिल कपूर होता. माझा पहिला सिनेमा आणि पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर यायची वेळ आली त्या 'ईश्वर' सिनेमात अनिल कपूर माझ्यासोबत होता. तेव्हापासून तो माझा क्रश आहे. तर ऑल टाईल क्रश सांगायचं झालं तर अमिताभ बच्चन यांचं मी नाव घेईल.'

सुकन्या मोने यांनी अनिल कपूरचं नाव घेताच सुचित्रा बांदेकरही खुश झाल्या. माझाही तोच क्रश आहे असं त्यांनी सांगितलं. तर दुसरीकडे शिल्पा नवलकर यांनी मात्र क्रिकेटपटू संजय मांजरेकरचं नाव घेतलं. 'बाईपण भारी देवा' सिनेमा ३० जून रोजी रिलीज झाला. या सिनेमाने एका आठवड्यात 12.50 कोटींचा गल्ला जमवला. अजूनही चित्रपट थिएटरमध्ये धुमाकूळ घालतोय.

टॅग्स :सुकन्या कुलकर्णीअनिल कपूरमराठी अभिनेतामराठी चित्रपटबॉलिवूड