Join us

प्रवीण तरडे अन् स्मिता गोंदकरचं रोमँटिक गाणं, म्हणाले, 'बायकोने पाहिलंच नाही कारण...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 09:45 IST

रोमँटिक गाणं केल्याने प्रविण तरडेंची बायको चिडली

मराठी अभिनेते प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांचा आगामी 'बलोच' सिनेमाचं ट्रेलर नुकतंच प्रदर्शित झालं. यामध्ये प्रवीण तरडेंचा वेगळाच लुक समोर आला आहे. विशेष म्हणजे अभिनेत्री स्मिता गोंदकरसोबत (Smita Gondkar) त्यांनी रोमँटिक गाणं केलं आहे. मात्र त्यांच्या बायकोने काही हे गाणं अजून पाहिलं नाही असा खुलासा त्यांनी एका मुलाखतीत केला आहे. 

ट्रेलर लॉंचनंतर प्रवीण तरडेंनी अनेक मुलाखती दिल्या. यातील एका मुलाखतीत त्यांना रोमँटिक गाण्यावरुन पत्नीची प्रतिक्रिया काय होती असं विचारण्यात आलं. तेव्हा ते म्हणाले, 'खरं सांगायचं तर रोमँटिक गाणं करणं माझ्या स्वभावातच नाही. काय माहित मला का ते गाणं देण्यात आलं. माझ्या बायकोने तर ते गाणं पूर्ण पाहिलंच नाहीए. ती पाहणारच नसल्याचं तिने मला सांगितलंय. ते गाणं खरं तर इतकं सुंदर झालंय पण बायको सोडून सर्वांनी पाहिलं.'

ते पुढे म्हणाले, 'मी तिला समजावलं की हा फक्त सिनेमा आहे पण तरी ती रागावली. सरसेनापती हंबीररावमध्ये तिने माझ्या पत्नीची भूमिका साकारली होती. त्यात रोमँटिक गाणं का केलं नाही असा प्रश्न तिने मला विचारला.'

रोमँटिक गाणं करण्याचा अनुभव कसा होता यावर ते म्हणाले, 'तलवार चालवणं यापेक्षा सोपं होतं. मी तर घाबरत घाबरतच स्मिताच्या गालावरुन हात फिरवला. मग तिनेच मला कंफर्टेबल राहा असं सांगितलं होतं. खरंतर माझ्या नाकीनऊ आलं होतं पण कसंतरी ते पूर्ण झालं.'

'बलोच' या सिनेमात प्रविण तरडे आणि स्मिता गोंदकर यांच्यावर 'आस खुळी' हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. गायिका श्रेया घोषालने हे गाणं गायलं आहे. 5 मे रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :प्रवीण तरडेपरिवारमराठी अभिनेतामराठी चित्रपट