Join us
Daily Top 2Weekly Top 5

Prajakta Mali : प्राजक्ता माळीला सोनू सूदकडून मिळाली भारी कॉम्प्लिमेंट...; वाचा, प्राजूची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 13:28 IST

Prajakta Mali : नुकतंच प्राजक्ताने ब्रह्मपुरी महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली. अभिनेता सोनू सूदही या महोत्सवात हजर होता. याच ठिकाणी प्राजक्ताने सोनूचं लक्ष वेधून घेतलं...

प्राजक्ता माळी (Prajakta Mali ) जिथे जाईल तिथे तिची चर्चा हाेते. आता तर काय प्राजूला बाॅलिवूड अभिनेता सोनू सूदकडून  (Sonu Sood) कॉम्प्लिमेंट मिळाली. होय, प्राजक्ताने एक खास पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. तर निमित्त होतं, ब्रह्मपुरी महोत्सवाचं.

नुकतंच प्राजक्ताने ब्रह्मपुरी महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली. या महोत्सवातील काही फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. अभिनेता सोनू सूदही या महोत्सवात हजर होता. याच ठिकाणी प्राजक्ताने सोनूचं लक्ष वेधून घेतलं. प्राजक्ताला पाहून तो सुद्धा कॉम्प्लिमेंट देण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही.

तुम्हाला ठाऊक असेलच की, प्राजक्ताने नुकताच प्राजक्तराज हा ज्वेलरी ब्रॅण्ड सुरू केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्राजक्ताच्या ज्वेलरी ब्रॅण्डच्या उद्घाटन सोहळ्यात उपस्थित होते. प्राजक्तराजच्या खास कलेक्शनमध्ये सोने व चांदीचे दागिने आहेत. तर आपल्या याच ब्रॅण्डचे दागिने घालून प्राजक्ता ब्रह्मपुरी महोत्सावाच्या उद्घाटन सोहळ्याला गेली. यावेळी तिने सुंदर हिरवीकंच साडी आणि गळ्यात प्राजक्तराजची वज्रटिक घातली होती. या गळ्यातल्या हारानं सोनू सूदचं लक्ष वेधून घेतलं. प्राजक्ताने एका पोस्टमध्ये याबद्दल माहिती दिली आहे.

“ब्रम्हपुरी महोत्सव…“प्राजक्तराज” विषयी महोत्सवाइतकं बोललं गेलं की मी भारावून गेले. खूप आभार. ठरवून टाकलं…‘प्राजक्तराज’चं पहिलं प्रदर्शन विदर्भात लागणार…“भद्रावती”. By the way…सोनू सूद ही म्हणाले, “गळ्यातलं unique आहे..” अर्थातच ‘प्राजक्ताराज’ची ‘वज्रटिक’ परिधान केली होती..”, अशी पोस्ट तिने केली आहे.

प्राजक्ता माळीने केलेली ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.  सोनू सूदने प्राजक्ताचं आणि प्राजक्तराजचं कौतुक केलं म्हटल्यावर प्राजू हरकून गेली आहे.

टॅग्स :प्राजक्ता माळीसोनू सूदमराठी अभिनेताबॉलिवूड