Prajakta Mali Fitness Secret Shared Video: मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ता ही तिच्या सौंदर्यासाठी आणि फिटनेससाठी ओळखली जाते. तिचे सुदृढ आणि सुडौल शरीर पाहता, प्रत्येक चाहत्याला तिच्या फिटनेसचे रहस्य काय आहे, हे जाणून घ्यायचे असते. प्राजक्ताचे फिटनेस रहस्य कोणत्याही महागड्या डाएट चार्टमध्ये नाही, तर योग हे आहे. प्राजक्ता उत्तम आहारासोबतच तिच्या दिनचर्येत योगाभ्यास करते. ती नियमितपणे व्यायाम करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना प्रोत्साहन देत असते.
नुकतंच प्राजक्ताने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला, ज्यात ती सूर्यनमस्कार करताना दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले, "हे तर फक्त सूर्यनमस्कार… (३ प्रकारचे)... खरी अष्टांग योग सिरीज ह्या नंतर सुरू होते… हा व्हिडीओ टाइम-लॅप्स मोडमध्ये शूट केला आहे, पण प्रत्यक्षात तो खूप सावकाश करायचा असतो.. मी श्वासाच्या तालात हळूहळू करत आहे. खरी "अष्टांग योग" प्रेमी. कोणत्याही वयात अष्टांग योग करता येतो. मी ६० व्या वर्षीही हे करत राहीन". प्राजक्ताचा हा व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांनाही प्रेरणा मिळाली आहे. असा आहार आणि व्यायाम फॉलो करत प्राजक्ता नेहमी निरोगी आणि फिट राहते.
प्राजक्ता केवळ एक अभिनेत्री नसून ती एक यशस्वी निर्माती आणि व्यावसायिकही आहे. तिने 'फुलवंती' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसेच तिचा स्वतःचा दागिन्यांचा ब्रँड आहे आणि कर्जतमध्ये तिचे एक मोठे फार्महाऊसही आहे.