Join us

सप्तपदीपासून ते पाठवणीपर्यंत! पूजा सावंतने शेअर केला लग्नातील पहिला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 17:07 IST

Pooja sawant: पूजाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्या लग्नातील प्रत्येक विधी, कार्य यांची झलक पाहायला मिळत आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत (Pooja sawant) हिने अलिकडेच लग्नागाठ बांधली. सिद्धेश चव्हाण याच्यासोबत पूजाने मोठ्या थाटात लग्न केलं. विशेष म्हणजे अजूनही तिच्या लग्नाची चर्चा काही कमी झालेली नाही. या लग्नसोहळ्यातील अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतांना दिसत आहेत. यामध्येच आता पूजाने तिच्या लग्नाचा संपूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

पूजाने नुकताच इन्स्टाग्रामवर एक शॉर्ट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या एन्ट्रीपासून ते पाठवणीपर्यंत प्रत्येक विधी, कार्यक्रमांचं शूट रेकॉर्ड केलेलं आहे. यात लग्नातील अनेक लहानमोठे प्रसंग कॅप्चर करण्यात आले आहेत.

दरम्यान, पूजाने सिद्धेश चव्हाणसोबत लग्नगाठ बांधली असून सिद्धेश डिस्नी या प्रसिद्ध कंपनीत नोकरी करत असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे सध्या तो ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक असून पूजादेखील काही काळासाठी तिथे शिफ्ट होणार आहे.

टॅग्स :पूजा सावंतसेलिब्रिटीसिनेमाबॉलिवूडलग्न