Join us

Video: निवेदिता सराफ यांच्याकडून भावाला जंगी पार्टी; पाणीपुरी, बिर्याणीचा केला झक्कास बेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 16:05 IST

Nivedita saraf: निवेदिता सराफ यांचं 'निवेदिता सराफ रेसिपी' या नावाने एक युट्यूब चॅनेल देखील आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे निवेदिता सराफ.नाटक, सिनेमा आणि मालिका अशा सगळ्याच ठिकाणी त्यांचा मुक्तपणे वावर आहे. त्यामुळे आज त्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. इतकंच नाही तर अभिनेत्री असण्यासोबतच त्या यशस्वी उद्योजिका आणि युट्यूबरदेखील आहेत. निवेदिता सराफ यांचं 'निवेदिता सराफ रेसिपी' या नावाने एक युट्यूब चॅनेल आहे. यावर त्या पारंपरिक पदार्थांपासून पाश्चात्य पद्धतीच्या पदार्थांपर्यंत अनेक रेसिपी शेअर करत असतात. परंतु, यावेळी त्यांनी त्यांच्या भावासाठी चक्क मुंबईचं स्ट्रीट फूड तयार करत त्याला छानसं सरप्राइज दिलं.

नुकताच दिवाळी भाऊबीजेचा सण झालं. या दिवसाचं निमित्त साधत निवेदिता सराफ यांनी त्यांच्या लाडक्या भावाला चाट फूडची मेजवानी दिली. त्यांनी त्यांच्या हाताने रगडा पॅटीसपासून पाणीपुरीपर्यंत अनेक चाटचे पदार्थ तयार केले होते. या सगळ्या पदार्थांची झलक त्यांनी त्यांच्या व्हिडीओमधून दिली आहे.

दरम्यान, निवेदिता सराफ यांनी शेव बटाटापुरी, दही बटाटा पुरी, रगडा पॅटीस, पाणीपुरी आणि त्याचबरोबर हैदराबादी चिकन दम बिर्याणी आणि व्हेज बिर्याणी असा साग्रसंगीत जेवणाचा बेत केला होता. निवेदिता सराफ यांना स्वयंपाक करण्याची आणि तो इतरांना खाऊ लागण्याची फार आवड आहे. त्यामुळे त्या कायम सेटवरही घरी तयार केलेल पदार्थ त्यांच्या सहकलाकारांसाठी घेऊन जातात. 

टॅग्स :निवेदिता सराफटेलिव्हिजनसेलिब्रिटीनाटकसिनेमा