Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रेलियात प्रिया बापटचं बोल्ड फोटोशूट, फिटनेस पाहून चाहत्यांनी केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 08:41 IST

प्रिया सध्या नाटकाच्या दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियात आहे.

मराठमोळ्या अभिनेत्रींचा बोल्ड अंदाज सध्या सोशल मीडियावर चर्चेत असतो. नुकतंच मिताली मयेकरने बाली येथील बीचवर बिकीनी फोटोशूट केलं. काहींना तिचे फोटो आवडले तर काहींनी नेहमीप्रमाणे ट्रोल केलं. आता अभिनेत्री प्रिया बापटनेही (Priya Bapat)  टू पीसमध्ये फोटोशूट केलंय. प्रिया सध्या नाटकाच्या दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियात आहे. नाटक झाल्यानंतर टीमसोबत एन्जॉय करताना तिने हे बोल्ड फोटोशूट केलंय.

प्रिया बापटने ऑस्ट्रेलियात ते ज्या ठिकाणी थांबले होते तेथील फोटो पोस्ट केलेत. पाण्यात निसर्गाचा आनंद घेताना ती दिसत आहे. प्रियाने टू पीस आऊटफिट घातला असून ती नेहमीप्रमाणेच सुंदर दिसतीए. स्वच्छ पाणी, निरभ्र आकाश, सूर्याची किरणं यामध्ये प्रियाचे हे सुंदर फोटो लक्ष वेधून घेणारे आहेत. तसंच तिचा फिटनेस पाहून चाहत्यांनी तिचं कौतुक केलंय. प्रियाचा हा हॉट अंदाज सगळ्यांनाच आवडलाय. 'वाईल्ड अँड फ्री' असं कॅप्शन तिने दिलं आहे.

प्रियाच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. 'जबरदस्त फिटनेस','बोल्ड अँड ब्युटिफुल','नाद केला' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. प्रिया आणि उमेश ही गोड जोडी 'जर तर ची गोष्ट' या नाटकातून सध्या नाट्यरसिकांना भेटत आहे. याच नाटकाच्या दौऱ्यासाठी प्रिया-उमेश टीमसोबत ऑस्ट्रेलियाला गेले होते. या मराठमोळ्या कपलचे ऑस्ट्रेलियातील फोटो खूपच व्हायरल होत आहेत.

टॅग्स :प्रिया बापटमराठी अभिनेताव्हायरल फोटोज्सोशल मीडियाउमेश कामतनाटकआॅस्ट्रेलिया