Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऐश्वर्या नारकर यांचं खरं वय माहितेय? चाहत्यांशी गप्पा मारताना जन्मतारीखच सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 13:06 IST

ऐश्वर्या नारकर या मराठी सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेत्री आहेत.

ऐश्वर्या नारकर या मराठी सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेत्री आहे.  ऐश्वर्या नारकर यांनी अपल्या अभिनयाने आणि नृत्यकलेने आगळी-वेगळी ओळख बनवली आहे. ऐश्वर्या नारकर या नेहमी हेल्दी आणि फिट राहतात. त्यामुळे त्यांच्या वयाचा अंदाज येत नाही. ऐश्वर्या नारकर या अगदी २५ -३० वर्षाच्या तरूणींसारख्या क्लासी दिसतात. त्यामुळे त्यांचे नेमके वय किती, यावर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात. यातचा आता ऐश्वर्या नारकर यांनी थेट त्यांची जन्मतारीखच सांगून टाकली. शिवाय कोकणातलं त्यांचं गाव कोणतं आणि सध्या मुंबईत त्या कुठे राहतात, हेदेखील त्यांनी सांगितलं. 

 ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर कायम आपले फोटो शेअर करत असतात.  सोशल मीडियाच्या माध्यमांतून त्या चाहत्यांच्या कायम संपर्कात असतात. नुकतच त्यांनी सोशल मीडियावरुन "आस्क मी एनिथिंग" हे सेशन घेतलं. त्यामध्ये अनेकांनी त्यांना बरेच प्रश्न विचारलं. यातच एका चाहत्याने त्यांना थेट जन्मतारीख विचारली. यावर ऐश्वर्या यांनीदेखील '८ डिसेंबर १९७४' ही आपली जन्मतारीख असल्याचं सांगितलं.

एवढंच नाही तर एका चाहत्याने ऐश्वर्या नारकर यांना त्या मुंबईत कुठे राहतात, असं विचारलं. त्यावर 'बोरीवली' मध्ये राहत असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच   एका चाहत्याने त्यांना 'तुम्ही वैश्यवाणी आहात ना, तुमचं गाव कोणतं?',  असा प्रश्न केला. यावर त्यांनी पती अविनाश नारकर यांच्यासोबत फोटो शेअर करत त्यांचं गाव हे 'भुईबावडा' असल्याचं सांगितलं.

ऐश्वर्या नारकर सिनेसृष्टीत बऱ्याच वर्षांपासून सक्रिय आहेत. अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या त्या 'झी मराठी' वाहिनीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत 'रुपाली राज्याध्यक्ष' हे नकारात्मक पात्र साकारत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमांमध्येही काम केलं आहे. तसंच सोशल मीडियावरही त्यांचा दांडगा वावर आहे.

टॅग्स :ऐश्वर्या नारकरसेलिब्रिटीटेलिव्हिजनमराठी अभिनेतासोशल मीडियाअविनाश नारकरबोरिवली