Join us

'मोरुच्या मावशी'चा लेक आहे उत्तम अभिनेता; विजू मामांच्या मुलाने केलंय 'या' मालिकेत काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 07:00 IST

Varad chavan: विजय चव्हाण यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या मुलानेही कलाविश्वात पदार्पण केलं आहे. त्याने अनेक मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे.

आपल्या दर्जेदार अभिनयशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा स्वत:वर खिळवून ठेवणारे ज्येष्ठ अभिनेता म्हणजे विजय चव्हाण (vijay chavan).  अनेक सिनेमा, नाटक यांच्या माध्यमातून चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या विजय चव्हाण यांचं निधन होऊन बराच काळ झाला. मात्र, त्याच्या कलाकृतीतून आजही ते प्रेक्षकांमध्ये जिवंत आहेत. त्यामुळेच सोशल मीडियावर त्यांच्याविषयी वरचेवरच चर्चा रंगत असते. मोरुची मावशी हे नाटक अजरामर करणाऱ्या या अभिनेत्याचा मुलगादेखील कलाविश्वात सक्रीय आहे. इतकंच नाही तर त्याने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

विजय चव्हाण यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या मुलानेही कलाविश्वात पदार्पण केलं आहे. अलिकडेच तो 'आई मायेचं कवच' या मालिकेत झळकला होता. या मालिकेसह त्याने काही गाजलेल्या सिनेमांमध्येही काम केलं आहे.

विजय चव्हाण यांच्या मुलाचं नाव वरद चव्हाण (Varad chavan) असं असून त्यानेही वडिलांप्रमाणे त्याचं नाव कलाविश्वात निर्माण केलं आहे. वरदने आई मायेचं कवच या व्यतिरिक्त ऑन ड्युटी 24 तास, धनगरवाडा या सिनेमांमध्ये काम केलं आहे. तर, 100 डेज, लेक माझी लाडकी या मालिकांमध्ये काम केलं आहे.

दरम्यान, विजय चव्हाण यांचं काही वर्षांपूर्वी दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत कलाविश्व गाजवून सोडलं होतं. मोरूची मावशी, श्रीमंत दामोदर पंत ही त्यांची नाटकं प्रचंड गाजली आहेत. वहिनीची माया या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. झपाटलेला, पछाडलेला, भरत आला परत यांसारख्या अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. 

टॅग्स :विजय चव्हाणसेलिब्रिटीसिनेमाटेलिव्हिजन