Join us

'माझे पाय जमिनीवर आहेत, पण...;'संकर्षण कऱ्हाडेच्या पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 16:00 IST

Sankarshan karhad: संकर्षणने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून त्याचं कॅप्शन चर्चेत आलं आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता, कवी आणि उत्तम सूत्रसंचालक म्हणून लोकप्रिय असलेला अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे (sankarshan karhade). आपल्या कलागुणांमुळे संकर्षण अल्पावधीत लोकप्रिय झाला. नाटक, मालिका अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकणारा संकर्षण सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय आहे. त्यामुळे तो कायम त्याच्याविषयीचे अपडेट चाहत्यांना देत असतो. यामध्येच त्याने एक नवीन फोटोशूट केलं आहे.

संकर्षण अत्यंत साधा असून तो प्रेक्षकांसमोरही तितक्याच साधेपणाने वावरतो. त्यामुळे लोकप्रिय अभिनेता असूनही तो कधीच त्याचा स्टारडम प्रेक्षकांसमोर दाखवत नाही. त्याच्या याच साधेपणामुळे तो चाहत्यांना आपलासा वाटतो. यात अलिकडेच त्याने फोटोशूट केलं असून त्याचा अनुभव शेअर केला आहे.

"हा मी आहे का …………??? मी या फोटोशूटच्या निमित्ताने असा पहिल्यांदा उभा राहिलो. तसे माझे पाय जमिनीवर आहेत … पण थोडे हवेत गेले कि फोटो चांगला येतो असं सांगण्यात आलं …. म्हणून ही पोज दिली, बरं वाटतंय का ..?", असं कॅप्शन देत त्याने हा फोटो शेअर केला आहे.

दरम्यान, संकर्षण माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत अखेरचा झळकला होता. या मालिकेनंतर त्याने त्याचा मोर्चा रंगभूमीकडे वळवला आहे. सध्या त्याची 'तू म्हणशील तसं', 'नियम व अटी लागू' ही दोन्ही नाटकं प्रचंड लोकप्रिय ठरत आहेत. या नाटकांचे देशासह विदेशातही प्रयोग झाले आहेत.  

टॅग्स :सिनेमामराठी अभिनेतासेलिब्रिटीटेलिव्हिजननाटक