Join us
Daily Top 2Weekly Top 5

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्विक प्रतापला लॉटरी लागली! मराठी सिनेमात साकारणार मुख्य भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 14:52 IST

पृथ्विकची मराठी सिनेमात वर्णी लागली आहे. पृथ्विक 'डिलिव्हरी बॉय' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा शो अगदी आवडीने पाहिला जातो. अनेक नवोदित कलाकारांनाही हास्यजत्रेमुळे प्रसिद्धी मिळाली. अभिनेता पृथ्विक प्रतापही हास्यजत्रेमुळे प्रसिद्धीझोतात आला. अभिनय आणि विनोदाची सांगड घालत पृथ्विक प्रेक्षकांना खळखळवून हसवतो. आता पृथ्विकची मराठी सिनेमात वर्णी लागली आहे. पृथ्विक 'डिलिव्हरी बॉय' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

नुकताच 'डिलिव्हरी बॉय' या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमात पृथ्विक महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. 'डिलिव्हरी बॉय' सिनेमाच्या टीझरमध्ये पृथ्विकची झलक पाहायला मिळत आहे. सरोगसीवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात अभिनेता प्रथमेश परब मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमातून सरोगसीसारख्या महत्त्वाच्या विषयावर अत्यंत हलक्याफुलक्या आणि विनोदी पद्धतीने भाष्य करण्यात आलं आहे. टीझर पाहून या सिनेमाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. प्रथमेश आणि पृथ्विकबरोबर या सिनेमात अभिनेत्री अंकिता लांडे मुख्य भूमिकेत आहे. 

पृथ्विकचा 'डिलिव्हरी बॉय' सिनेमा येत्या ९ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. मोहसीन खान यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. नुकतंच या सिनेमातील 'भाऊचा नाद' हे गाणं प्रदर्शित झालं आहे. पृथ्विकने या आधी काही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'क्लास ऑफ ८३' या हिंदी सिनेमातही पृथ्विक झळकला होता. सध्या तो महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहे. 

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रापृथ्वीक प्रतापटिव्ही कलाकारमराठी चित्रपट