Join us

गौतमी पाटीलने सांगितला तिच्या लग्नाचा प्लॅन; व्हॅलेंटाइन डेला केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 16:03 IST

Gautami patil: अखेर लग्नाच्या चर्चांवर गौतमीने सोडलं मौन

गौतमी पाटील (gautami patil)  हे नाव सध्या तरुणांमध्ये चांगलंच लोकप्रिय आहे. त्यामुळे तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी तरुण मंडळी उत्सुक असतात. यात खासकरुन तिच्या लग्नाविषयी नेटकऱ्यांमध्ये जास्त चर्चा रंगते. गौतमी लग्न कधी करणार?, ती कोणाला डेट करतीये का? हे आणि असे अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांना पडतात. या प्रश्नाचं तिने नुकतंच उत्तर दिलं आहे.

गौतमीने ती लग्न कधी करणार या प्रश्नाचं उत्तर देत तिचा प्लॅन सांगितला आहे. अलिकडेच तिने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तिला तिच्या लग्नाचा प्लॅन विचारण्यात आला. यावर तिने उत्तर दिलं.

कधी लग्न करणार गौतमी?

व्हॅलेंटाइन डे असल्यामुळे तिला खास हा लग्नाचा प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, सध्या तरी लग्नाचा कोणताच विचार नसल्याचं तिने यावेळी सांगितलं. गेल्या काही काळात गौतमी चांगलीच प्रकाशझोतात आली आहे. इतकंच नाही तर ती सिनेमातही झळकली आहे. आतापर्यंत 'पाटलांचा बैलगाडा', 'सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम', 'गावरान ठसका' अशी कितीतरी गाणी तिची लोकप्रिय झाली आहेत.

टॅग्स :गौतमी पाटीलटेलिव्हिजनसिनेमासेलिब्रिटी