Join us
Daily Top 2Weekly Top 5

#BanLipstick: 'मी लिपस्टिकला सपोर्ट करत नाही'; प्राजक्ता माळीने बॅन केली लिपस्टिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 14:43 IST

Prajakta mail : प्राजक्ता माळीने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने "मला लिपस्टिकचा रंग नको... मी लिपस्टिकला सपोर्ट करत नाही. बॅन लिपस्टिक!", असं म्हटलं आहे.

सध्या सोशल मीडियावर #BanLipstick  हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंड होतोय. मराठी कलाविश्वातील अनेक अभिनेत्रींनी लिपस्टिक बॅन केली असून त्यांनी व्हिडीओ शेअर केले आहेत. अभिनेत्री तेजस्विनी पंडितने #BanLipstick चा पहिला व्हिडीओ शेअर केला आणि त्यानंतर अनेक अभिनेत्रींनी लिपस्टिक बॅन केल्याचं पाहायला मिळालं. तेजस्विनी पंडित, सोनाली खरे या अभिनेत्रीं पाठोपाठ आता प्राजक्ता माळीनेदेखील लिपस्टिक बॅन केली आहे. प्राजक्ताने, मी लिपस्टिकला सपोर्ट करत नाही, असं म्हणत व्हिडीओ शेअर केला आहे.

प्राजक्ता माळीने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने "मला लिपस्टिकचा रंग नको... मी लिपस्टिकला सपोर्ट करत नाही. बॅन लिपस्टिक!", असं म्हटलं आहे. सोबतच कॅप्शनमध्येही तिने लिपस्टिकला सपोर्ट करत नसल्याचं लिहिलं आहे. विशेष म्हणजे तेजस्विनीप्रमाणेच प्राजक्ताचाही हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु, या व्हिडीओमागील कारण अद्याप कोणालाही स्पष्ट झालेलं नाही.

दरम्यान, मराठी कलाविश्वातील एक-एक अभिनेत्री असा व्हिडीओ शेअर करत असल्यामुळे ही नेमकी भानगड काय? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे #BanLipstick  हा हॅशटॅग सध्या चर्चेत येत आहे. 

टॅग्स :प्राजक्ता माळीसेलिब्रिटीसिनेमाटिव्ही कलाकारतेजस्विनी पंडित