Join us

फोटोत दिसणाऱ्या गोड मुलीला ओळखलं का? आज आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 14:16 IST

सध्या सोशल मीडियावर एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा बालपणीचा  फोटो व्हायरल होत आहे.

वयाने कितीही मोठे झालो तरीदेखील बालपणीच्या आठवणीत रमायला आजही अनेकांना आवडतं. यात सेलिब्रिटीदेखील अपवाद नाहीत. अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत असतात. सध्या सोशल मीडियावर एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा बालपणीचा  फोटो व्हायरल होत आहे.  हे फोटो पाहून या अभिनेत्रीला ओळखनं देखील अवघडं झालं आहे. 

गेली अनेक वर्ष मराठी चित्रपट मालिका आणि नाटक या तिन्ही माध्यमातून आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान पक्क करणारी अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. या अभिनेत्रीने आतापर्यंत अनेक उत्कृष्ट कलाकृती मराठी सिने इंडस्ट्रीला दिल्या आहेत. तिने नुकतेच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने बालपणी कशी दिसायची याची झलक आपल्या चाहत्यांना दाखवली आहे.

अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिथे ती अनेक वेगवेगळ्या पोस्ट शेअर करते. हेमांगीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ती हिंदी मालिका  ‘कैसै मुझे तुम मिल गए’ यामध्ये काम करताना दिसत आहे. यात ती भवानी चिटणीसची भूमिका साकारत आहे.  हेमांगी कवीने याआधी 'तेरी लाडली मै' या हिंदी मालिकेत महत्तवपूर्ण भूमिकेत दिसली होती.

 याशिवाय तिने 'अवघाचि संसार', 'मन धागा धागा जोडते नवा', 'वादळवाट', 'लेक माझी दुर्गा', 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच हेमांगी सुष्मिता सेनसोबत ताली या वेबसीरिजमध्ये झळकली आहे. क्रिकेटर युवराज सिंह आणि अमिताभ बच्चन यांच्याबरोबर जाहिरातीत स्क्रीन शेअर केल्यामुळे ती चर्चेत आली होती. 

टॅग्स :हेमांगी कवीबॉलिवूडसेलिब्रिटीटिव्ही कलाकारमराठी अभिनेता