Join us

मंगेश देसाईंचं घर तुम्ही पाहिलंत का? अभिनेत्यानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसली झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 13:44 IST

मंगेश देसाईंच्या घराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

2024 हे वर्ष प्रत्येकासाठीच खास असणार आहे. नव्या वर्षात नव्याची कास धरत नवी सुरुवात करणे प्रत्येकाला हवेहवेसे असते. अशी सुरुवात अभिनेता-निर्मात मंगेश देसाईंनी केली आहे.  प्राजक्ता माळी, सई ताम्हणकर, केतकी चितळे, ऋतुजा बागवे या मराठी कालाकारांनी काही महिन्यांपूर्वीच नवं घर घेत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर आता  मंगेश देसाईंनी नवं घर घेत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. मंगेश देसाईं यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर घराची पहिली झलक शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये संपूर्ण कुटुंबिय दिसत असून घराची झलक पाहायला दिसत आहे. 

मंगेश देसाईंनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये संपुर्ण घर पाहायाला मिळत आहे. त्यांनी व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहलं, 'घर म्हणजे नुसतं विटांच काम नसतं, घर पहाटेच सुंदर स्वप्नं असतं, घर नात्यांचे रेशीम बंध असतं, घर त्यात वास्तव्य करण्याचे अस्तित्व असतं आणि जेव्हा गणपती बाप्पाचा आशीर्वाद आणि तुमच्या शुभेच्छांनी ते भरतं तेव्हा त्याला कोणाची दृष्ट लागू शकत नाही'. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, त्यांच्या सूनबाई वृषाली शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी देखील नव्या घरात मंगेश देसाई यांची भेट घेऊन अभिनेत्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

मंगेश देसाईंच्या घराला अतिशय पारंपरिक टच आहे. मंगेश यांच्या नव्या घरात कलाकार मंडळींसह अनेक राजकीय मंडळींनीही बाप्पाचं दर्शन घेतलेलं व्हिडीओमध्ये पहायला मिळत आहे. सगळेजण अतिशय आनंदी आहेत. शिवाय, या व्हिडीओमध्ये घरातील आकर्षक घराच्या इंटेरिअरने लक्ष वेधलं. अतिशय हटके अशी ही इंटिरिअरची स्टाईल चाहत्यांना आवडली आहे.  याचबरोबर त्यांच्या या सुंदर घरातील देवघर खूपच छान आहे. चाहत्यांनी व्हिडिओवर प्रतिक्रिया देत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास मंगेश 'धर्मवीर 2' च्या माध्यमातून पुन्हा एकदा निर्मितीची धुरा सांभाळत आहेत.

टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटीसिनेमामराठी चित्रपटसुंदर गृहनियोजनमुंबई