Join us

अशोक सराफांसोबत काम करणारी ‘ही’ मुलगी आता आहे मातब्बर राजकारणी! तुम्ही ओळखलं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 14:57 IST

अभिनय ते राजकारण! भाजपच्या 'या' माजी महिला खासदाराने अशोक सराफांसोबत चित्रपटात केलंय काम, ओळखलं?

Marathi Cinema:  राजकारण आणि सिनेसृष्टीचं कनेक्शन फार नवं नाही. अनेक स्टार कलाकार राजकारणात आले, तर काही स्टार प्रचारकांच्या यादीत असतात. यापूर्वी देखीला सिनेमांमध्ये राजकारणाचा धुरळा अनेकदा पाहायला मिळालाय. कलाविश्व आणि राजकारण यांचा तसा पाहायला गेलं तर जवळचा संबंध आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांनी राजकारणाची वाट धरली. परंतु, भाजपाच्या एका माजी खासदार महिलेने एका मराठी चित्रपटात काम केलं होतं, असं जर तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. 

साल १९९४ मध्ये पुरुषोत्तम बेर्डे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'भस्म' हा चित्रपट एका मसनजोग्याच्या जीवनावर आधारित चित्रपट होता. या चित्रपटात अशोक सराफ यांनी मुख्य भूमिका साकारली होती. त्याचबरोबर या चित्रपटात चारुशीला साबळे, रविंद्र बेर्डे यांसारख्या कलाकारांनी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. पण, तुम्हाला माहिती आहे का? या चित्रपटात अशोक सराफ यांच्या मुलीची भूमिका भाजपच्या माजी खासदार पूनम महाजन यांनी साकारली होती. भस्म मध्ये त्या अशोक सराफ यांची मोठी मुलगी दुर्गीचं पात्र साकारलं होतं. 

दरम्यान, त्याकाळी 'भस्म' हा चित्रपट काही अडचणींमुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. शिवाय त्यावेळी विनोदी चित्रपटांची चलती असल्यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली. पूनम यांनी चित्रपटात केलेल्या अभिनयाचं अशोक सराफ यांनी कौतुक देखील केलं होतं. 

पूनम महाजन आणि अगदी लहान वयात 'भस्म' चित्रपटात अभिनय केला होता. त्यानंतर त्यांनी राजकारणात एन्ट्री घेतली. दोन वेळा उत्तर-मध्य मुंबईच्या खासदार राहिलेल्या पूनम भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या आहेत. २०१९ मध्ये पूनम महाजन यांनी ४ लाख ८६ हजार ६७२ मते मिळवित काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांचा पराभव केला होता. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात पूर्वीपासून काँग्रेसविरुद्ध भाजप अशी लढत होत आली आहे. तिथे भाजपच्या उमेदवार पूनम महाजन सलग दोन वेळा येथून निवडून आल्या आहेत.

टॅग्स :अशोक सराफपूनम महाजनभाजपामराठी चित्रपट