Join us  

अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचं निधन, सोशल मीडियावर शेअर केली भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 8:50 AM

शुभा खोटे यांनी त्यांच्या सहजीवनाचे काही फोटो शेअर केले.

मराठी तसेच हिंदी सिनेक्षेत्रातही प्रसिद्ध असणाऱ्या अभिनेत्री शुभा खोटे (Shubha Khote) यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे पती दिनेश बलसावर यांचं काल रात्री निधन झालं. 60 वर्षांचा त्यांचा सुरेख संसार झाला. मात्र काल वृद्धापकाळाने दिनेश बलसावर यांची प्राणज्योत मालवली. शुभा खोटे यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही दु:खद बातमी दिली.

शुभा खोटे यांनी त्यांच्या सहजीवनाचे काही फोटो शेअर केले. पतीसोबतचे अनेक क्षण त्यांनी यामध्ये टिपले आहेत. अगदी तरुण वयापासून ते उतारवयापर्यंतचे हे फोटो आहेत. यासोबत त्यांनी कॅप्शन देत लिहिले, "गेल्या ६० वर्षांपासून आपण एकमेकांना सांगत आहोत की सोबत म्हातारे होऊ या. अजून सर्वोत्तम घडायचं आहे. The last of life for which the first was made. गुडबाय, जीवनसाथी."

शुभा खोटे आणि दिनेश बलसावर यांचं 1960 साली लग्न झालं. ६४ वर्षांचा त्यांचा हा सहजीवनाचा प्रवास, कित्येक आठवणी. दिनेश बलसावर यांनी 1967 साली आलेल्या 'चिमुकला पाहुणा' सिनेमाची निर्मिती केली होती तर शुभा यांनी अभिनय आणि दिग्दर्शनही केलं होतं. पतीच्या विरहामुळे अभिनेत्री दु:खी आहेत. त्यांना अश्विन हा मुलगा आणि भावना ही मुलगी आहे. भावना सुद्धा सिनेसृष्टीत अभिनेत्री आहे.

टॅग्स :मराठी अभिनेतापरिवारमृत्यूसोशल मीडिया