Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मी जे काही आहे ते नाटकामुळेच'; आप्पीने सांगितलं तिच्या यशामागचं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 17:25 IST

Shivani naik: शिवानीने तिच्या यशाचं श्रेय रंगभूमीला दिलं आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवानी नाईक (shivani naik). 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत मुख्य भूमिका साकारुन शिवानी घराघरात पोहोचली. विशेष म्हणजे शिवानीची ही पहिलीच मालिका आहे. मात्र, त्यात तिने तिची भूमिका अत्यंत उत्तमरित्या साकारली आहे. या मालिकेमुळेच शिवानी अल्पावधीत लोकप्रिय झाली. मात्र, तिने तिच्या या यशाचं श्रेय रंगभूमीला दिलं आहे.

आज जागतिक रंगभूमी दिन साजरा केला जातोय. त्यामुळेच या दिवसाचं निमित्त साधत शिवानीने तिच्या नाटकातील काही आठवणी जाग्या केल्या. सोबतच तिच्या यशाचं श्रेय सुद्धा रंगभूमीला दिला.

नेमकं काय म्हणाली शिवानी?

 "मी आज जे काही आहे नाटकांमुळेच आहे. 'अप्पी आमची कलेक्टर' ही माझी पहिली मालिका आहे. त्या आधी मी नाटकातच काम करायचे. जो काही मी अभिनय शिकले किंवा करतेय ते फक्त नाटकामुळेच. मी  ३ ते ४ नाट्य संघाचा भाग होते. मी 'नाट्य वाडा' आणि 'नाट्य मल्हार' ह्या संस्थेत काम केलय. एकांकिका आणि दोन अंकी नाटकांमध्ये ही काम केले आहे, असं शिवानी म्हणाली.

दरम्यान, शिवानीसोबतच सारं काही तिच्यासाठीमधल्या निशीने म्हणजेच दक्षता जोईल हिने सुद्धा तिच्या अभिनयाचं श्रेय रंगमंचाला दिलं आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारनाटकसेलिब्रिटी