Join us
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: हर हर महादेव! क्रांती रेडकर अन् समीर वानखेडे यांनी घेतलं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 15:07 IST

क्रांती रेडकर ही मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

Kranti Redkar:क्रांती रेडकर (Kranti Redkar) ही मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. जत्रा या सिनेमातून ती घराघरात पोहोचली. कोंबडी पळाली हे गाणं कानावर पडताच डोळ्यासमोर अभिनेत्री चेहरा येतो. सध्या अभिनेत्री तिच्या वैवाहिक आयुष्यात व्यस्त आहे. दरम्यान, क्रांती रेडकर आणि अधिकारी समीर वानखेडे हे सतत चर्चेत राहणारं जोडपं आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ, फोटो शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकतंच क्रांती व समीर दोघांनी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथील जोतिर्लिंगाचं दर्शन घेतलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोघेही महादेवाचा आशीर्वाद घेताना दिसत आहेत.

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिरात क्रांती रेडकर पती समीर वानखेडे पोहोचले आहेत. त्याठिकाणी जाऊन ते दोघेही महादेवाच्या भक्तीत तल्लीन झाल्याची पाहायला मिळाले. याशिवाय त्यांनी महादेवाची मनोभावे पूजा केली आहे. "फक्त कृतज्ञताच आपल्याला पायावर उभं राहायला शिकवते. आपल्या आयुष्यात येणारे चांगले-वाईट अनुभव ही परमेश्वराने एकप्रकारे आपली घेतलेली परीक्षा असते. आपल्याला पुढे जाण्यास तोच मदत करत आहे, आपली काळजी घेत आहे आणि संगोपन करत आहे. स्वीकृती ही गुरुकिल्ली आहे." असं कॅप्शन देत अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर केली आहे. क्रांती रेडकरने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या खूप कमेंट्स आणि लाइक्स येत आहेत. 

क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे यांनी २०१७ मध्ये  लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. एनसीबीचे डॅशिंग अधिकारी समीर वानखेडे आणि क्रांती यांना जुळ्या मुली आहेत. झिया आणि जायदा असे त्यांच्या मुलींची नावे आहेत. क्रांती आणि समीर यांचा अगदी सुखाचा संसार सुरू आहे. या दोघांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 

टॅग्स :क्रांती रेडकरसमीर वानखेडेनाशिकसोशल मीडिया