Join us  

किशोरी शहाणेंचा सळसळता उत्साह; 36 वर्षानंतरही रिक्रिएट केलं 'तुझी माझी जोडी जमली' गाणं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 3:51 PM

Kishori shahane: किशोरी शहाणे यांनी 36 वर्षानंतर त्यांच्याच गाजलेल्या गाण्यावर पुन्हा एकदा ताल धरला.

मराठी कलाविश्वात आज अशा कितीतरी अभिनेत्री आहेत ज्यांनी ९०चा काळ गाजवला आहे. यात सुप्रिया पिळगांवकर, प्रिया बेर्डे, अश्विनी भावे,  किशोरी शहाणे, वर्षा उसगांवकर यांसारख्या कित्येक अभिनेत्रीचं आवर्जुन नाव घेतलं जातं. या अभिनेत्री आजही इंडस्ट्रीमध्ये यशस्वीपणे सक्रीय आहे. इतकंच नाही तर त्यांचा सोशल मीडियावरही तितकाच दांडगा वावर आहे. यात सध्या अभिनेत्री किशोरी शहाणे यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. बऱ्याच वर्षांनी त्यांनी त्यांच्याच एका गाजलेल्या गाण्यावर पुन्हा डान्स केला आहे.

अभिनेत्री हेमांगी कवीने (hemangi kavi) तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती किशोरी शहाणे (kishori shahane) यांच्यासोबत एका गाजलेल्या मराठी गाण्यावर डान्स करतांना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने किशोरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

बऱ्याच वर्षानंतर किशोरी यांनी माझा पती करोडपती या सिनेमातील त्यांच्याच तुझी माझी जोडी जमली गं.. या सुपरहिट गाण्यावर डान्स केला. विशेष म्हणजे त्याचा उत्साह आणि एनर्जी पाहून नेटकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे.

दरम्यान, इतक्या वर्षानंतरही हेमा अगदी तशीच आहे, असं म्हणत नेटकऱ्यांनी किशोरी यांचं कौतुक केलं आहे. माझा पती करोडपती हा सिनेमा १९८८ मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमात किशोरी शहाणे, सचिन पिळगांवकर,अशोक सराफ, सुप्रिया पिळगांवकर,निळू फुले यांसारखी कलाकार मंडळी झळकली होती.

टॅग्स :किशोरी शहाणेहेमांगी कवीसेलिब्रिटीसुप्रिया पिळगांवकरसिनेमा