Join us

मराठी अभिनेत्रीचा थाटात पार पडला लग्नसोहळा, नवऱ्याचं हास्यजत्रेशी आहे खास कनेक्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 09:20 IST

लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे.

Amruta Malwadkar Wedding: सध्या मराठी सिनेइंडस्ट्रीत लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. अलिकडेच प्राजक्ता गायकवाड हिचा साखरपूडा थाटामाटात पार पडला. प्राजक्तानंतर अभिनेत्री एतशा संझगिरी व अभिनेता निषाद भोईर यांचाही साखरपुडा झाला. या पाठोपाठ आता मराठी मालिकाविश्वात काम करणारी लोकप्रिय अभिनेत्री नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. 'कोण होतीस तू काय झालीस तू' फेम अमृता माळवदकर विवाहबंधनात अडकली आहे. 

अमृताने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चा लेखक विनायक पुरुषोत्तमसोबत लग्नगाठ बांधली. आपल्या खास दिवशी अमृताने सुंदर साडी नेसली होती. त्यावर गोल्डन ज्वेलरी, नाकात नथ, हातात हिरवा चुडा असा साज श्रृंगार तिने केला. या संपूर्ण लुकमध्ये अमृता खूपच मोहक आणि अप्रतिम दिसत होती. तर विनायकने अमृताच्या लूकशी मॅचिग असा ऑफ व्हाइट रंगाचा सदरा घातला होता. पारंपरिक वेशभूषेत हे दोघेही एकत्र खूपच सुंदर आणि आनंदी दिसत होते.  दोघांच्या साधेपणातही असलेला हा शाही अंदाज चाहत्यांना खूप भावला. सध्या अमृता माळवदकर आणि विनायक पुरुषोत्तमच्या मित्रमंडळींनी सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. चाहतेही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. 

अमृताचा नवरा काय करतो?अमृताचा नवरा विनायक पुरुषोत्तम देखील मनोरंजन सृष्टीतील आहे. तो 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चा (Maharashtrachi Hasya Jatra) लेखक आहे. विनायक आणि अमृता अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते आणि एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करायचे. दिवाळी अमृताचा लग्नानंतर पहिलाच सण असणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Marathi actress Amruta Malwadkar weds 'Hasyajatra' writer Vinayak Purushottam.

Web Summary : Actress Amruta Malwadkar, known for 'Kon Hotis Tu Kay Jalis Tu,' married Vinayak Purushottam, a writer for 'Maharashtrachi Hasyajatra.' The couple looked radiant in traditional attire, with fans showering them with blessings. This Diwali will be Amruta's first after marriage.
टॅग्स :मराठी अभिनेताटिव्ही कलाकारसेलिब्रिटीलग्नमहाराष्ट्राची हास्य जत्रा