Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री आसावरी जोशीच्या हाती 'घड्याळ'; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 13:57 IST

Aasavari joshi: मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यालयामध्ये त्यांच्या पक्षप्रवेशाचा छोटेखानी कार्यक्रम पार पडला.

प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री आसावरी जोशी (Aasavari Joshi) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत हातावर घड्याळ बांधलं आहे. नुकताच आसावरी जोशी यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.  उत्तम अभिनय आणि संवादफेक कौशल्य यामुळे आसावरी जोशी ओळखल्या जातात. मात्र, राजकारणात प्रवेश करुन त्यांनी त्यांची नवी ओळख निर्माण केली आहे.

मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यालयामध्ये त्यांच्या पक्षप्रवेशाचा छोटेखानी कार्यक्रम पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला.

कोण आहेत आसावरी जोशी?

मराठी कलाविश्वातील चतुरस्त्र अभिनेत्री म्हणून आसावरी जोशींकडे पाहिलं जातं. त्यांनी मराठीसह हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. सध्या त्या ‘स्वाभिमान : शोध अस्तित्वाचा’ या मालिकेत प्रा. अदिती सुर्यवंशी ही भूमिका साकारत आहेत. तसंच त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. १९८६ मध्ये आलेल्या ‘माझं घर, माझा संसार’ या मराठी चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं.  ‘ऑफिस-ऑफिस’, ‘प्यार जिंदगी है’, ‘धाम धूम’, ‘एक रात्र मंतरलेली’, ‘गोडी गुलाबी’, ‘जबान संभालके’, ‘सुखी संसाराराची १२ सुत्रे’ आणि ‘बाल ब्रह्मचारी’ अशा असंख्य हिंदी मराठी मालिका, चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवारसिनेमासेलिब्रिटी