Join us
Daily Top 2Weekly Top 5

सूरज चव्हाणनंतर आणखी एक मराठी अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नीही आहे प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 10:04 IST

सूरज चव्हाणने धूमधडाक्यात लग्न केल्यानंतर आणखी एक मराठी अभिनेता लग्नबंधनात अडकला आहे. विशेष म्हणजे त्याची बायकोही अभिनेत्री आहे

गेल्या काही दिवसांपासून अनेक मराठी अभिनेत्यांच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. नुकताच सूरज चव्हाण लग्नबंधनात अडकला आहे. याशिवाय अभिनेत्री पूजा बिरारी, अभिनेता सोहम बांदेकर, अभिनेत्री भाग्यश्री न्हालवे, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड या मराठी कलाकारांची लगीनघाई सुरु आहे. अशातच एक मराठी अभिनेता लग्नबंधनात अडकला आहे. अभिनेत्याची बायकोही टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. हा अभिनेता म्हणजे स्वानंद केतकर. 

स्वानंदची बायकोही मराठी अभिनेत्री

स्वानंद केतकरने 'तू तेव्हा तशी' आणि '३६ गुणी जोडी' या मालिकांमध्ये अभिनय केला आहे. स्वानंदने अभिनेत्री अक्षता आपटेसोबत लग्न केलं आहे. स्वानंद केतकरने सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. स्वानंदने फोटो शेअर करताच त्याच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. स्वानंद आणि अक्षता यांनी '३६ गुणी जोडी' मालिकेत अभिनय केला होता. या मालिकेत दोघांनी बहीण-भावाची भूमिका साकारली होती. ऑनस्क्रीन बहीण-भावाची ही जोडी आता ऑफस्क्रीन नवरा-बायको झाले आहेत. 

स्वानंदची बायको अक्षता आपटे ही अभिनेत्री आणि कवियित्री आहे. स्वानंद व अक्षता हे दोघे अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेमुळे स्वानंद घराघरात पोहोचला. या मालिकेत त्याने नील ही भूमिका साकारली होती. या मालिकेत स्वप्नील जोशी व शिल्पा तुळसकर मुख्य भूमिकेत होते. २०२३ मध्ये या दोघांनी साखरपुडा केला होता. आता साखरपुड्यानंतर २ वर्षांनी दोघे लग्नबंधनात अडकले आहेत. अशाप्रकारे ऑन स्क्रीन बहीण भाऊ आता ऑफ स्क्रीन नवरा-बायको झाले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Marathi actor Swanand Ketkar marries actress Akshata Apte after on-screen sibling role.

Web Summary : Following Suraj Chavan, actor Swanand Ketkar married actress Akshata Apte. They previously played siblings in '36 Guni Jodi.' After engagement in 2023, the couple tied the knot. Ketkar is known for 'Tu Tevha Tashi'.
टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारलग्नशुभविवाहमराठी अभिनेता