Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 10:55 IST

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याने कायद्यावर भाष्य केलं

बदलापूरमधील चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अक्षय शिंदे हा आरोपी अटकेत होता. 23 सप्टेंबरला अक्षय शिंदेने पोलिसांच्या हातातील बंदूक हिसकावून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. या चकमकीत पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केला. यावरुन बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान मराठी अभिनेता रोहन गुजरने (Rohan Gujar) यावर एक मार्मिक पोस्ट शेअर केली  आहे.

मराठी नाटक, मालिकांमध्ये झळकणारा अभिनेता रोहन गुजरने काल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. यात तो लिहितो, "कायद्याने झालं असतं तर कायद्याबद्दलचा आदर अजून वाढला असता का? आणि ही 'सोय' जर यंत्रणेमध्ये आहे तर बडे बाप के बेटे का सुटतायत?"

गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यात हिट अँड रनच्या घटना घडल्या. यामध्ये बड्या बापाच्या मुलांनी सामान्य नागरिकांना कारने उडवलं आणि तिथून पळ काढला. काही आरोपींना तर फक्त निबंध लिहायची शिक्षा सांगितली. हाच धागा पकडत रोहन गुजरने यंत्रणेवर निशाणा साधला आहे. कायदा पाळा किंवा नका पाळू शेवटी सामान्य माणूसच भोगणार आहे हेच यातून स्पष्ट होतं. 

रोहन गुजर मराठीतील लोकप्रिय  अभिनेता आहे. 'होणार सून मी या घरची' मालिकेत त्याने पिंट्या ही भूमिका साकारली होती. त्याचं आमने सामने नाटकाचे प्रयोग जोरदार सुरु असतात. शिवाय तो सध्या सन मराठीवरील 'नवी जन्मेन मी' मालिकेत दिसत आहे.

टॅग्स :रोहन गुजरसोशल मीडियाबदलापूरमराठी अभिनेता