मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) बी-टाऊनमधलं सर्वात चर्चेतलं कपल होतं. दोघांच्या वयातील अंतरामुळे आणि मलायका एका मुलाची आई असल्यामुळे त्यांना खूप ट्रोल केलं जायचं. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु झाल्या. सिंघम अगेनच्या एका इव्हेंटमध्ये अर्जुन कपूरनेच 'अभी मै सिंगल हूँ' असं वक्तव्य करत चर्चांना दुजोरा दिला. अर्जुन कपूरने सार्वजनिकरित्या केलेल्या या स्टेटमेंटवर पहिल्यांदाच मलायका अरोराची रिॲक्शन समोर आली आहे.
ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत मलायकाला अर्जुन कपूरच्या 'मै सिंगल हूँ' स्टेटमेंटवरुन प्रश्न विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, "मी प्रायव्हेट व्यक्ती आहे आणि माझ्या आयुष्यातील असे काही पैलू आहेत ज्याबद्दल मला जास्त सांगायचे नाही. मी कधीच सार्वजनिकरित्या माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणार नाही. त्यामुळे जे अर्जुन म्हणाला ती त्याची मर्जी आहे."
अर्जुन कपूरसोबत नक्की काय घडलं होतं?
अर्जुन कपूर नुकताच रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' मध्ये व्हिलनच्या भूमिकेत दिसला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील दीपोत्सव कार्यक्रमात अर्जुन कपूर, टायगर श्रॉफ, रोहित शेट्टी आणि अजय देवगण यांनी हजेरी लावली होती. यावेळी अर्जुन कपूरला पाहताच लोकांनी 'मलायका...मलायका कशी आहे? असं ओरडायला सुरुवात केली. तेव्हा अर्जुन म्हणाला, 'अरे अभी मै सिंगल हूँ. रिलॅक्स करो.'